Published On : Wed, Aug 10th, 2022

काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा; विनोबा भावे नगर, गांधी चौकपासून आज सुरुवात

Advertisement

नागपूर : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्यांना वंदन करण्यासाठी काँग्रेसतर्फे सकाळी १०.३० वा. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत विनोबा भावे नगर, गांधी चौक येथे राज्याचे माजी उर्जामंत्री, माजी पालकमंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली.

९ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी ब्रिटिश सरकार विरोधात भारत छोडो आंदोलनाची सुरूवात झाली होती. या दिनाचे महत्त्व लक्षात घेता ९ ऑगस्ट ते स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट २०२२ या काळात देशात काँग्रेस पक्षातर्फे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे.

प्रथम गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमे ला माल्यार्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले. गांधी चौक – संजयबाग कॉलोनी – राजीव गांधी नगर – साई मंदिर परिसरात पदयात्रा काढण्यात आली.

प्रसंगी माजी आमदार अशोक धवड, सेवादल राष्ट्रीय सल्लागार कृष्णकुमार पांडे, प्रदेश काँग्रेस महासचिव संजय दुबे, प्रदेश काँग्रेस सचिव नरेंद्र जिचकार, प्रफुल्ल गुडधे पाटिल, नागपूर कांग्रेस उपाध्यक्ष रत्नाकर जयपुरकर, बंडोपंत टेंभुर्णे, सेवादल शहर अध्यक्ष प्रविण आगरे, सेवादल उत्तर नागपूर प्रमुख मुन्ना पटेल, माजी नगरसेवक जुल्फिकार भुट्टो, किशोर जिचकार, मन्सूर खान, खुशाल हेडाऊ, परसराम मानवटकर, ब्लाक क्रं.१५ अध्यक्ष मुलचंद मेहर, श्रीमती विजया हजारे, श्रीमती कल्पना द्रोणकर, सुवर्णा चालखुरे, संजय सहारे, नामदेव धोतरकर, राजेश कोहाड, अंगेश्वर देवांगन, रामाजी उईके, सतीश पाली, प्रफुल किरपाने, विपुल महल्ले, प्यारेलाल देवांगन, दिनेश सादनकर, दामोदर राऊत, अनिल गुप्ता, मकसूद पटेल, रज्जब भाई, नत्थु रोकडे, शेख साहबउद्दीन, मृणाल वडीचार, कल्पना गोस्वामी, अभिनव गोस्वामी, सचिन माथाडे, विलास बारस्कर, जितेंद्र वेडेकर, गौतम अंबादे, सचिन वासनिक, निलेश खोब्रागडे, चेतन तरारे, तपन बोरकर, बाबू खान, कुणाल निमगड़े, संतोष खड़से, निशांद इंदूरकर, आकाश इंदूरकर, शेख शनवाज, सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.