Published On : Mon, Sep 11th, 2017

कुश कटारिया हत्येमधील दोषी आयुष पुगलियाची कारागृहात हत्या

Advertisement

नागपूर : बहुचर्चित कुश कटारिया हत्येचा दोषी आयुष पुगलियाची नागपूर मध्यवर्ती कारागृहातच हत्या करण्यात आली. कैद्यांच्या आपापसांतील भांडणानंतर त्याची हत्या झाली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अपहरण आणि हत्याचा दोषी आयुष पुगलियाला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नागपूर मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता.

आज सकाळी साडे सातच्या सुमारास नागपूर कारागृह परिसरात सहकारी कैद्यांनी त्याची हत्या केली. कैद्यांनी अवजड टाईलने त्याच्या डोक्यात प्रहार केला आणि रक्ताच्या थारोळ्यात सोडून निघून गेले. त्यानंतर आयुष पुगलियाचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर जेल प्रशासनाने धंतोली पोलिस स्टेशनला याबाबतची माहिती दिली. कैद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. परंतु हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पोलिसांनी आयुष पुगलियाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवलं आहे. अहवालानंतरच त्याच्या हत्येचं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं