नागपूर: वीज बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सहकार्याने तत्कालीन महापौर अनिल सोले यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या पौर्णिमा दिवसाने आज चळवळीचे स्वरूप घेतले आहे. पौर्णिमा दिवसानिमित्त बुधवारी (ता. १६) मनपा कर्मचारी व ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी धरमपेठ येथील महर्षी वाल्मिकी चौकात (कॉफी हाऊस चौक) जनजागृती केली.
पौर्णिमा दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे रात्री ८ ते ९ असे एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. यासोबतच शहरातील एका परिसरात वीज बचतीबाबत जनजागृती करण्यात येते. बुधवारी महर्षी वाल्मिकी चौकात (कॉफी हाऊस चौक) जनजागृती करण्यात आली. या परिसरातील व्यापाऱ्यांना अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करीत ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी पौर्णिमा दिवसामागील संकल्पना समजावून सांगितली.
महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, श्रिया जोगे, बिष्णुदेव यादव, सुजय काळबांडे, तुषार देशमुख, दीपक प्रसाद, प्रिया यादव, साक्षी मुळेकर, रुचिरा अडकिने आदिंनी व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील अनावश्यक वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. यावेळी माजी आमदार प्रा. अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते.
व्यापारी व नागरिकांनी स्वयंसेवकांच्या विनंतीला मान देत या उपक्रमात वीज दिवे बंद करून सहभाग नोंदवला. मनपाच्या वतीनेही काही पथदिवे बंद करण्यात आले होते. काही व्यापाऱ्यांनी प्रत्येक पौर्णिमेला रात्री एक तास अनावश्यक वीज दिवे बंद ठेवणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी भोलानाथ सहारे, माजी नगरसेवक प्रेमलाल भांडारकर, अशोक सायरे, महेंद्र राऊत, नामदेव ठाकरे, दिनेश पटेल, विजय व्यास, विजय अग्रवाल, मृणाल यादव, अरविंद भन्साळी, सचिन चंदनखेडे, शिवचरण यादव, गुरमीत सिंग, अनुपमा सायरे, कविता मेश्राम, गिरिधारी निमजे, अनिल झोडे, कांचन शर्मा, योगिता झारारिया, सुधीर कपूर, नीतू अकतूलवार आदी उपस्थित होते.