Published On : Wed, Sep 23rd, 2020

कोरोना विषयी चित्ररथाव्दारे जनजागृती

जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

भंडारा: माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत जिल्हयात चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात येणार असून आज जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून जनजागृतीला सुरूवात केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर व डॉ. प्रशांत उईके यावेळी उपस्थित होते.

कोविड-19 विषानुचा प्रादुभाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौंटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करण आवश्यक झाले आहे.

अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी भंडारा जिल्हयात माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम सुरू असून या मोहिमे विषयी नागरिकांत हा चित्ररथ जनजागृती करणार आहेत.