Published On : Mon, Dec 23rd, 2019

अंबाझरी उद्यान व फुटाळा तलाव परिसरात स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती

नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाउंडेशनचा उपक्रम

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने रविवारी (ता.22) अंबाझरी उद्यान व फुटाळा तलाव परिसरात सिंगल यूज प्लाॅस्टिकचा बहिष्कार व स्वच्छ भारत अभियानबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.

महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात व मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात हे अभियान राबविण्यात आले. अभियानादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सदस्यांनी नुकतेच होणा-या स्वच्छ सर्वेक्षणबाबत माहिती दिली. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

शहरातील स्वच्छतेबाबत तक्रारींसाठी मनपातर्फे स्वच्छता अॅप-MoHUA सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी या अॅपचा वापर करण्याबाबतही सदस्यांनी आवाहन केले. सिंगल यूज प्लाॅस्टिकचे दुष्परिणाम, त्यामुळे होणारे नुकसान याबद्दल सांगताना सिंगल यूज प्लाॅस्टिकचा बहिष्कार करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे, असही आवाहन यावेळी सदस्यांनी केले. या अभियानात शहरातील नागरिकांनी उत्तम सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे यामध्ये तरूणांचा लक्षणीय सहभाग होता.

अभियानामध्ये ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, शीतल चैधरी, कार्तीकी कावळे, दिगंबर नागपुरे, नम्रता झवेरी, हेमंत आमेसर, अश्विनी दाबले, अद्विक दासगुप्ता आदींनी सहभाग नोंदवून स्वच्छतेबाबत जनजागृतीबाबत नागरिकांना आवाहन केले.