Advertisement
नागपूर : विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी १४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विभागात आज कोणत्याही तालुक्यात अतिवृष्टी झाली नाही. परंतु नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विभागात चोवीस तासांत जिल्हानिहाय सरासरी झालेला पाऊस कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. वर्धा ४८.४ (७१७.८), नागपूर १३.९ (६२१), भंडारा ६.१ (५६१.५) चंद्रपूर ५.२ (७५२.६), गडचिरोली ४.४(६४४.७) आणि गोंदिया ३.८(६२६.७), पाऊस झाला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.
नागपूर विभागात दि १ जून ते १९ जुलैपर्यंत सरासरी ६५५.५ मि. मी. पाऊस पडला.