Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 8th, 2020

  आटोमोटिव्ही ते टेकाडी फाट्यावरील महामार्ग अपघातिचे केंद्रबिंदू

  कन्हान : गेल्या दोन वर्षांपासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ऑटोमोटिव चौक नागपूर ते कन्हान जवळील टेकाडी फाट्यापर्यंत सुमारे अठरा किलोमीटर लांबीचा चार पदरी सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.जवळपास या रस्त्याचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
  २५० कोटी रुपये खर्च करून तयार करणयात आलेल्या चार पदरी स्त्याच्या बांधकामांवर राष्ट्रीय महामार्ग अधिका-यांची देखरेख असतांना बिगार भरल्यासारखे काम कसे झाले हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

  या रस्त्याच्या बांधकामांचे ‌‌‌कंत्राट के .सी. सी .बिल्डकान कंपनी ला देण्यात आले.सुरूवातीला कंपनी ने जोमाने कामे केली. नंतर मात्र कामाची गती मंदावली.नागपूर ते टेकाडी फाट्यापर्यंत सिमेंटीकरण झालेल्या रस्त्यावर दूचाकी किंवा चार चाकी प्रवास करतांना अत्यंत वाईट अनुभव येतो.सदर रस्ता खाचखळग्याचा आहे की सिमेंटीकरणाचा, असा संशय येतो.चार चाकी वाहने हेलकावे खात तर दुचाकी वाहने गचके खात मार्गक्रमण करीत असल्याचा अनुभव येतो.सिमेंटीकरन करतांना सपाटीकरण व्यवस्थित झाल्याची खात्री संबंधित काम पाहणा-या अधिकाऱ्यांची होती परंतू अर्थलाभातून जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करण्यात आले,असा ठाम समज‌ आता जनतेचा झाला आहे.

  रसत्याचा मधोमध भिंत व दोन्ही बाजूने फेवर ब्लाक तर दोन्ही बाजूंच्या नालीवर लालसर टाईलस

  लावणयात आलया आहेत अत्यंत ओबढधोबढ पदधतीने लावल्या आहेत‌ . रस्त्याच्या मधोमध वळणावर मधल्या भिंती च्या दोनही बाजूनेअंत्यंत चुकीच्या पद्धतीने फेवर ब्लाक लागले आहेत. रस्त्याच्या समांतर फेवर ब्लॉक लावण्याची आवश्यकता असताना अनेक ठिकाणी ऊबड खाबड पद्धतीने लावले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गाडी घसरून किंवा अडून पडण्याचे प्रकार सातत्याने होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी नाली बनविण्यात आली आहे. या नालिवर रेस खेळावी असा प्रकार सुरू असतो. लहान मुलांना हे दृश्य पाहून मौज वाटत असली तरी एका भागातील पाणी दुसऱ्या भागात उडत असल्याने मोटरसायकल वरील वाहन चालकांची चांगलीच गोची होते. चिखल व गढूळ पाण्याने माखलेले हे प्रवासी गंतव्य प्रवास तशाच अवस्थेत करतात.आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या नावाने बोटे मोडतात.

  रस्त्याच्या मधोमध सिमेंटचे दुभाजक उभारले आहेत.
  हे काम एका स्थानिक व्यापारी संघाच्या कथित नेत्याला दिल्याची चर्चा असून संबंधित संघाचा पदाधिकारी उर्फ ठेकेदार कामाची देखरेख करत होता
  पण हे काम करताना कामाची गुणवत्ता अनेकांनी भरल्या डोळ्यांनी पाहिली व त्याची डागडुजी करतानाही लोकांनी पाहिले. काँक्रेट भरल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्या काँक्रेट ला काही दिवस पाणी देण्याची आवश्यकता असताना लगेच दुसऱ्या दिवशी डागडुजी करून रंगरंगोटी करण्याचे काम बखूबीने केले.

  संबंधित ठेकेदार व्यापाऱ्यां च्या हक्कासाठी लढताना पाहिले पण व्यापारी वर्गा साठी लढता-लढता सदर पदाधिकारी बांधकाम ठेकेदार कधी बनला हे येथील जनतेला अद्यापही कळले नाही. व्यापाऱ्यांनाही हे माहित आहे पण ते का गप्प बसले हे न उलगडणारे कोडे आहे. एकूणच या महामार्गाच्या रस्त्याच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता प्राथमिक दृष्ट्या दिसत असले तरी महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी झोपले होते का अशा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांनी केला आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145