Published On : Wed, Dec 29th, 2021
By Nagpur Today Nagpur News

ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक प्रवासी अनुकूल, सोयी-सुविधायुक्त व जागतिक दर्जेचे ठरेल

Advertisement

नागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अ‍ॅक्वा आणि ऑरेंज लाईनवरील २४ मेट्रो स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू झालेली आहे. जागतिक दर्जाच्या, सोयीस्कर मेट्रो वाहतूक व्यवस्थेकडे नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. आता लवकरच रिच-२ म्हणजे सीताबर्डी इंटरचेन्ज ते ऑटोमोटिव्ह चौक या मार्गिकेवरील मेट्रो सेवा देखील सुरु करण्यात येणार आहे.

त्यामुळे या मार्गिकेवरील स्थानकांचे कार्य वेगाने प्रगतीपथावर आहे. तसेच या मार्गिके वरील व्हायाडक्ट आणि स्टेशनचे निर्माण कार्य ९० % पूर्ण झाले आहे. मुख्य बाब म्हणजे या मार्गिकेवरील कामठी रोडवर गड्डीगोदाम येथे तयार होत असलेली बहुस्तरीय वाहतूक प्रणाली हि देशातील एकमेव अद्वितीय अशी रचना असून नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरली आहे. ही डबल डेकर रचना ५.३ किमी (ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते गड्डीगोडम) पर्यंत लांबीची आहे. प्रस्तावित फ्लाय-ओव्हर आणि मेट्रो ट्रॅक ‘शेअर राईट ऑफ वे’ – 2 संरचना एकाच खांबावर बांधल्या जाणार आहे हे वैशिष्ट्य आहे.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सिताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन मार्गिकेवरील सर्वात शेवटचे महत्वपूर्ण मेट्रो स्थानक म्हणजे ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक आहे.
यापूर्वी सुरु झालेल्या मेट्रो स्थानकांप्रमाणेच हे स्थानक देखील उत्कृष्ट स्थापत्याचे उदाहरण असणारे आणि जागतिक दर्जाच्या सेवा आणि सोयी-सुविधांनी युक्त असणार आहे. बेसमेंटची प्रशस्त जागा, व्यावसायिकांसाठी संधी आणि पार्किंगची व्यवस्था यामुळे हे मेट्रो स्टेशन हॉस्पिटॅलिटी डेव्हलपमेंटच्या नियोजनात मानाचा तुरा ठरणार आहे. या स्थानकाचे एकूण क्षेत्रफळ – 4236 चौ.मी. असून लांबी – 78 मी आहे.

डाव्या बाजूचे कॉन्कोर्स लेव्हल:- 864, इंटरचेंज पातळी 864 m2, प्लॅटफॉर्म स्तर:- 864 m2, स्ट्रीट लेव्हल:- 864 m2. उजव्या बाजूची रस्त्याची पातळी 195 m2 आण कॉन्कोर्स लेव्हल – 195 मी असणार आहे. स्थानकाला ४ बाजूने लिफ्ट, ५ एस्केलेटर आणि ७ बाजूने चढायला जिने असणार आहेत. याशिवाय विपुल प्रमाणात पार्किंग व्यवस्था आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून प्रवासी अनुकूल फीडर सेवा पुरविण्यात येणार आहे.

मेट्रो ट्रेनच्या आगमनाने ऑरेंज सिटीची जीवनशैली बदलू लागली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मेट्रोने प्रवास करून, वेळ आणि इंधनाची बचत करून ट्रॅफिक जामपासून मुक्त होत आहेत. त्याचबरोबर पगारदारांचाही मेट्रोकडे कल वाढत आहे. मेट्रो ट्रेनमध्ये सायकल घेऊन जाण्यासाठी देण्यात आलेल्या सवलतीचा फायदा विद्यार्थी घेत आहेत. मेट्रोने लोकांच्या जीवनशैलीत बदल आणण्यास सुरुवात केली आहे, दुसरीकडे नागपूर शहर जागतिक दर्जाच्या महानगरांच्या श्रेणीत पोहोचले आहे. या सगळ्या प्रगतीमुळेच रिच-२ आणि रिच-४ या मार्गेकेवरही मेट्रो सेवा लवकर सुरु करण्याची मागणी वाढत चालली आहे

Advertisement
Advertisement