Published On : Fri, Apr 16th, 2021

अतुल लोंढे कॉंग्रेसचे बोगस प्रवक्ते, काम धंदा शून्य मात्र बोलण्यात पटाइत : भा.ज.यु.मोर्चा

नागपूर : नागपूर शहरात कोरोनाची स्थिती आटोक्याबाहेर असताना कॉंग्रेसचे बोगस प्रवक्ते लोंढे यांना राजकारण दिसू लागले आहे. गडकरींवर टिका करण्यापूर्वी आपण कोविड रुग्णांसाठी काय करत आहोत, याची जाणीव असली पाहिजे. कॉंग्रेसचे पालकमंत्री यांनी शासनाकडून काय व्यवस्था केली, जरा त्यावर बोला. कोरोनाची दुसरी लाट येणार आहे, याची प्रचीती असताना देखील राज्य शासनाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नाही. रेमडेसेवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता गडकरी साहेबांनी स्वत: थेट कंपनीशी संपर्क साधून 10 हजार इंजेक्शन मागवून त्याचा पुरवठा नापुर शहराला केला. ज्यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचविले. गडकरी-फडणवीस यांच्या संयुक्त प्रयत्नाने जामठा येथील नॅशनल कॅसर इन्स्टीटयूट, येथे 100 बेडची अतिरिक्त सोय करण्यात आली. मात्र नागपुरात कॉंग्रेसचे मंत्र्यांनी काय सुविधा केल्यात, त्यांनाच ठाऊक.

अतुल लोंढे, याचा कुठलाही जनसंपर्क नसून एकही रुग्णाला सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. काम-धंदा शून्य असलेला हा व्यक्ती मिडियाचे माध्यमातून स्वत:ला नेता म्हणवून घेतो. कोरोनाच्या बाबतीत आजपर्यंत एकही सकारात्मक स्टेटमेंट त्यांनी दिले नाही, उलट गडकरी साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्याबद्दल बोलताना आपण स्वत: कुठ आहोत याचा मात्र त्याला विसर पडतो. साधे नगरसेवकांची निवडणूक लढविण्याची लायकी नसलेला हा व्यक्ती कॉंग्रेसचा बोलका पोपट असून कर्तव्यशून्य असा कार्यकर्ता आहे.

Advertisement

गडकरी-फडणवीस पासून ते भा.ज.प.चे. आमदार/ नगरसेवक व कार्यकर्ते सर्वजण कोविड रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, रेमडेसेवीरची पूर्तता करणे तर महानगरपालिकेच्या माध्यमातून वाढीव वीजबिले कमी करून देण्याचे काम भा.ज.प.चे कार्यकर्ते सातत्याने करीत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधरी कॉंग्रेसने कोविड रुग्णांना काय सुविधा देता येईल, हे सोडून फुकटचे राजकारण करणे अशोभनीय कृत्य आहे. भारतीय जनता युवा मोर्चा, पूर्व नागपूर याचा जाहीर निषेध करते.

कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या वक्तव्यावर उक्त प्रतिक्रिया भारतीय जनता युवा मोर्चा, पूर्व नागपूरचे अध्यक्ष सन्नी राऊत व सचिन करारे यांनी दिलेली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement