| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Apr 7th, 2018

  सरकारी कर्मचाऱ्याला इजा करण्याचा प्रयत्न


  कन्हान: पोलीस स्टेशन अंतर्गर कन्हान-पिपरी नदी घाटावर बुधवार दि ०४. ०४. १८ चे सायंकाळी ७ वाजता दरम्यान फिर्यादी हे.कॉ.अमित रामेश्वर मेहरे ब.नं २२६१ विशेष पथक नागपूर ग्रामीण चे डुमे पोलीस उपविभागीय अधिकारी व कर्मचारीसह अवैध वाळू चोरी ची माहिती काढत असता कन्हान नदी पिपरी घाट येथून ट्रॅक क्र एम.एच ४० – १५४६ किंमत ४ लाख रु हे वाळू चोरी करून येत असल्याचे दिसल्याने गणवेशातील कर्मचारी यांने सदर ट्रॅकला थांबविन्याचा इशारा केला असता ट्रक चालक याने इशाऱ्याला न जुमानता सरकारी कामत अळथडा निर्माण करीत कर्मचाऱ्याला इजा होईल या इराद्याने भरवेगाने ट्रॅक घेऊन पळून गेला.

  अवैध वाळू विकणारा गजानन तिवाडे हा ऍक्टिव्ह मोपेट गाडी क्र एम.एच ३१ टी.सि ०५३० ने आपल्या मित्रासह आला असता तो सुद्धा वाळू चोरी करीत असल्याचे त्याचा मोबाईल वरून निष्पन्न झाल्याने आरोपी गजानन मोतीराम तिवाडे , उमेश सुखलाल वाडीवे दोन्ही रा.पिपरी कन्हान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक किंमत ४ लाख, ऍक्टिवा ,मोबाईल, व वाळू चोरी करण्याचे साहित्य घमीले, पावडे किंमत ५०,००० असा ऐकून चार लाख पन्नास हजार रु चा मुद्देमाल जप्त केला असून कन्हान पोलीस स्टेशन कलम ३५३, ३७९, ३४ भादंवि, सहक १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीना अटक केली . पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पी. एस.आय प्रल्हाद धवड करीत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145