Published On : Tue, Jun 8th, 2021

नागपूर मध्य रेल्वे स्थानकावर हमालांचा कोव्हिड आर.टी.पी.सी.आर.. चाचणीला उत्सर्फूत प्रतिसाद महानगरपालिका मंगळवारी झोन कार्यालय व मध्य रेल्वेचा संयूक्त उपक्रम.

Advertisement

सर्व हमालांना राशन सामुग्रीचे वाटप

नागपूर: नागपूर मध्य रेल्वे स्थानकावर उपस्थित सर्व नव्वद हमालांपैकी सर्व हमालांनी कोव्हिड आर.टी.पी.सी.आर. चाचणी मंगळवारी (८ जून) रोजी करवून घेतली. नागपूर महानगरपालिका मंगळवारी झोन कार्यालय क्र. 10 व मध्य रेल्वे च्या माध्यमातून संयूक्त असा उपक्रम राबवून आर.टी.पी.सी.आर. चाचणी ची विशेष मोहिम रेल्वे स्थानकांवरील हमालांसाठी राबविण्यात आली त्याप्रमाणेच मध्य रेल्वेचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक श्री. कृष्णांत पाटील, विभागीय वाणिज्य प्रबंधक श्री. विपुल सुरकार व श्री. वसंत पालीवाल, श्री जरिन वर्गीस यांच्या सहकार्याने राशन सामुग्रीचे वाटप करण्यात आले.

मध्य रेल्वेच्या विभागीय प्रंबंधक सौ. रिचा खरे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक श्री. कृष्णकांत पाटील व नागपूर महानगरपालिका मंगळवारी झोन कार्यालय क्र. 10 चे सहा. आयुक्त श्री विजय हुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक उर रहमान खान व मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ. श्री विपूल सुरकार यांच्या नेतृत्वात हया विशेष मोहीमेचे आयोजन संपन्न झाले.

मध्य रेल्वेच्या स्थानकांवर आज नव्वद हमाल उपस्थित होते व संपूर्ण नव्वदही हमालांनी उत्सफूर्तपणे कोव्हिड आर.टी.पी.सी.आर. चाचणी करवून घेऊन व मोफत वितरण राशन सामुग्रीची उचल करून विशेष मोहीम यशस्वी केली.

सदर मोहीमेत नागपूर स्थानकावर विविध गाडयातून उतरणा-या 155 प्रवाशांची व 90 हमालांची अश्या एकूण 245 नागरीकांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी करवून घेतली. डॉ. राधीका ब्रिजवार यांच्या वैद्यकीय पथकात डॉ. रोशन इंगळे, डॉ. विवेक निमजे, डॉ. नितेश कनोजे, डॉ. गूंजन मालविया व डॉ. स्नेहल पवार तसेच सहाय्यक, श्री करण गुप्ता, श्री तरूण निर्मल, श्री अनिरबन घोष, इत्यादींनी कोव्हिड चाचणी पथकात कार्य केले.

मध्य रेल्वेचे स्टेशन संचालक श्री. दिनेश नागदिवे, प्रवासी साधने पर्यवेक्षक श्री प्रविण रोकडे, समन्वयक श्री पूरूषोत्तम कळमकर यांनी कोव्हिड चाचणीच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.