Published On : Tue, Apr 21st, 2020

यावेळी कृपया आपले पाणीदेयक ऑनलाईन बघा आणि ऑनलाईनच भरा

Advertisement

ग्राहकांना SMS अपडेटसाठी मोबाईल क्रमांक नोंदविण्याचेही आवाहन

नागपूर, : कोरोना उद्रेकामुळे संपूर्ण जग घरात बसले असल्याने नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी नागरिकांना आपले पाण्याचे देयक ‘ई-बिल’ स्वरुपात ऑनलाईन बघण्याचे आवाहन केले आहे. पाणी देयके एसएमएस अपडेट स्वरुपात मोबाईलवर देखील उपलब्ध होतील.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

छपाईच्या सुविधा लॉकडाऊनमुळे उपलब्ध नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना इलेक्ट्रोनिक स्वरुपात तेसेच एसेमेस अपडेट्सच्या माध्यमातून या त्रैमासिकाची पाणीदेयके देण्याचे ठरविले आहे. सर्वच नागरिकांना सरासरी देयके देण्यात आलेली आहेत मात्र त्यासाठी नागरिकांना www.ocwindia.com या संकेतस्थळावरील “Consumer Corner” या पानावर जाऊन स्वत:ला नोंदवावे लागेल.

नागपूर शहर प्रशासन, नागपूर पोलीस व मनपा यांच्या सहकार्याने OCW ने गर्दी टाळण्याच्या उद्देशाने आपली देयक स्वीकृती केंद्रे बंद ठेवली आहेत आणि यापूर्वीच नागरिकांना पेटीएएम, ऑनलाईन बिल पोर्टल यासारख्या डिजिटल सुविधांचा वापर करून देयके भरण्याचे आवाहन केले आहे. यामागे नागरीका तसेच कर्मचाऱ्यांची सुरक्षा हा उद्देश आहे.

पाणी ग्राहकांना त्यांचे ‘ई-बिल’ ऑनलाईन बघण्याचे व भरण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून झोन कार्यालयांमध्ये सहसा होणारी गर्दी टाळता येईल.

ऑनलाईन बिलिंग सुविधा @www.ocwindia.com आणि ‘नागपूर वॉटर’ या अधिकृत अॅपद्वारे या सोप्या व पारदर्शी माध्यमांतून मनपा-OCW नागरिकांसाठी सर्व सुविधा सहजसाध्य करून देण्यात आलेल्या आहेत.

ई-बिल

ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर देयकदिनांकाच्या दुसऱ्या दिवशी पीडीएफ स्वरुपात ‘ई-बिल’ प्राप्त होईल. ही सुविधा ग्राहकांनी स्वत:हून आपला ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक www.ocwindia.com वर नोंदविल्यानंतरच सुरु करण्यात येईल.

नोंदणीसाठी:

• CAN (करार क्रमांक) आवश्यक आहे.
• ग्राहक पडताळणीसाठी GIS ID किंवा मीटर क्रमांक विचारण्यात येईल. हे दोन्ही तपशील बिलावर उपलब्ध आहेत.
• एकदा पडताळणी झाल्यानंतर मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी भरून OTP प्राप्त होईल. हा OTP देऊन मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी नोंदवता येईल.
• नोंदणी एकदाच करण्याची परवानगी आहे. कुठल्याही दुरुस्तीसाठी ग्राहकांना कॉल सेंटरवर टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल.
For any other information or complaints regarding water supply please contact NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899

Advertisement
Advertisement