कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी नगरसेवक व गटनेता राजेंद्र शेंदरे यांना न प कर्मचारी यांनी मध्यरात्री घरी जावुन शिवीगाळ करून जिवे मारण्याची धम की दिल्याने कन्हान पोलीस स्टेशनला चारही आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला असुन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा हयाना निवेदन देऊन चारही दोषी कर्मचा -याना निलबित करण्याची मागणी शेंदरे व शिष्टमंडळाने केली.
मंगळवार (दि.२६) मे च्या मध्यरात्री १ वाजता नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र २ चे नगरसेवक व कन्हान नग र विकास आघाडीचे गटनेता राजेंद्र शेंदरे शिवनगर कन्हान येथील राहते घरी झोप ले असता जिणा चढुन पहिला माळयावर जावुन दार ठोकुन शिवीगाळ केल्याने शेंदरे व घरचे घाबरून थोडया वेळाने दार उघडुन पाहिले असता हातात चाकु सारखी वस्तु घेऊन जिण्याच्या पाय-या उतरून घरा सामोर अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन नगरपरिषद कर्मचारी १) प्रितम सोमकु वर, २) उमेश कठाणे व न प कंत्राटी कामगार ३) पंकज वांढरे, ४) अमित सांभारे पळाल्याने मी त्यांना फोन केला असता प्रितम सोमकुवर हयांनी फोनवर शिवीगाळ देत रात्री १.१५ वाजता कुठे कुठे पाणी दयाचे आहे असे धमकी दिल्याने मी (शेंदरे) घाबरून कन्हान पोलीस स्टेशन गाठुन न प कर्मचा-या विरूध्द तक्रार दिल्याने पोलीसांनी चारही आरोपी विरूध्द भादवि कलम ४४८, २९४, ५०६, ३४ अन्वये मध्यरात्री ४.३० वाजता गुन्हा दाखल केला.
नगरपरियद कर्मचा-यांनी कन्हान नगर विकास आघाडी गटनेता व जनप्र तिनिधी राजेंद्र शेंदरे यांच्या घरी मध्यरात्री १ वाजता जावुन अश्लील शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याने या चार ही लोकांना त्वरित सेवेतुन निलबित कर ण्यात यावे अशी मागणी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, मुख्याधिकारी संदीप चिंदेवार हयांना निवेदन देऊन केली. शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष शंकर चंहादे, माजी उपाध्यक्ष डॉ मनोहर पाठक, गटनेता राजेंद्र शेंदरे, नगरसेनिका सुषमा चोपकर, अनिता पाटील, संगिता ताई खोब्रागडे, वंदना कुरडकर, वर्षा लोंढे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नियमानुसार दोषी कर्मचा-यावर का र्यवाही करण्यात येईल. – मुख्याधिका री संदीप चिद्रेवार
या प्रकरणी दोन्ही न प कर्मचारी यांचे नियमानुसार वरिष्ठाकडे प्रस्ताव पाठवुन त्यांच्या मार्गदर्शात कार्यवाही करण्यात येईल. तसेच दोन कंत्राटी कामगार असल्याने त्याना कामावरून बंद करण्यात येईल.