नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे जलप्रदाय विभागाने अवैध रित्या शहराचे बाहेर बांधकामासाठी टँकरव्दारे पिण्याचे पाणी देणा-या दोन टँकर चालका विरुध्द कारवाई केली आहे.
या दोन्ही टँकर मालकांची सेवा कायम स्वरुपी बंद करुन त्यांची सुरक्षा रक्कम सुध्दा जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई स्थायी समिती अध्यक्ष आणि जलप्रदाय समितीचे सभापती श्री.विजय (पिंटू) झलके यांच्या निर्देशावरुन करण्यात आली.
नॉन नेटवर्क क्षेत्रात टँकर मार्फत नागपूर शहराच्या सीमे बाहेर बहादुरा येथील संजूबा हायस्कूल समोर बांधकामासाठी अवैध रित्या टँकरव्दारे पिण्याचे पाणी दिले जात असल्याची तसेच पाणी देण्यासाठी टँकर चालक शुल्क आकारत असल्याची तक्रार स्थायी समिती अध्यक्ष व जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांना प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत झलके यांनी त्वरित जलप्रदाय विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्याआधारे विभागाने टँकर क्रमांक एम.एच. 49- 855 आणि एम.एच. 49- 0852 या दोन टँकरची सेवा तात्काळ बंद करुन त्यांची सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यात आली.
