Published On : Thu, Aug 20th, 2020

रामटेक येथे चिमुकल्यांनी घरच्या घरीच साजरा केला तान्हा पोळा.

रामटेक -. कोरोनाच्या प्रादुर्भावमुळे चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण.बालगोपाल यांच्या खुशिकरिता रामटेक येथे तान्हा पोळा घरच्या घरीच अगदी साधेपणाने साजरा केला .आवडता तान्हा पोळा सण म्हणजे बालकांच्या उत्साहाचा दिवस.

भारत हा कृषिप्रधान देश असून शहरात व ग्रामीण भागात मंगळवारी बैलपोळा साधेपणाने साजरा करण्यात आला. शहरात मातीच्या बैलांची विधीवत पूजा करण्यात आली. तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी घरच्या घरीच बैलांची पूजा केली.

बैल पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे तान्हा पोळा असतो. तान्हा पोळा हा लहान मुलांचा आवडता सन आहे या सणाची मुले आतुरतेने वाट बघत असतात.
यादिवशी लहान मुले आपले नांदी सजवून घरोघरी जातात. विविध ठिकाणी नंदी बैलांची स्पर्धा देखील असते या स्पर्धेत चिमुकले नटून थटून छान वेशभूषा करून येतात.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवस्न दिवस रुग्ण वाढत असल्यामुळे सरकार च्या निर्देशानुसार लहान चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण पडले.
बालगोपाल यांच्या आनंदाकरिता रामटेक येथे तान्हा पोळा घरच्या घरीच अगदी साधेपणाने साजरा केला.

नंदु कावळे, सचीन धारंगे, मनोज् बिडवाईक , घरजाले ,राजू नागरीकर ,गुद्धू शेंडे, रूपेश घरझाले, वीर घरझाले, कैलास चौधरी,आरूहि चौधरी ,कृतीक धरांगे , मानस धारांगे,वंदना धारंगे,मयुरी धारंगे चेतन लारोकर तसेच इतर पालक वर्ग भोजारा देउन आपल्या चिमुकल्यांच्या आनंदात सहभागी झाले होते.