नागपूर: जगभरात कोरोना विषाणूची साथ सुरु आहे. लॉकडाऊन मुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध नाही व मोठया प्रमाणात श्रमिकांचे स्थलांतर चालू आहे. लॉकडाऊन काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुणीही घराबाहेर पडत नसतांना असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज, महाराष्ट्र या संस्थेचे सदस्य असलेल्या सनदी अधिकारी व कर्मचारी यांच 3 राज्य व 9 जिल्हयात अविरत सेवाकार्य सुरु आहे. डॉ. किशोर मानकर,आए.एफ.एस. (भारतीय वन सेवा )यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ७ जिल्हयात तसेच पश्चिम बंगाल व रायपूर येथे हे मदत कार्य होत आहे.
लॉकडाऊन घोषित झाल्याच्या तारखेपासूनच पासून बेटिया फाऊंडेशन, ज्ञानदिप, समर्पण,समता सैनिक दल तसेच इतर अशासकीय संस्थांतर्फे आर्थिक मदत तसेच अन्नधान्न पुरविण्याचे काम सुरु असून असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्पाईज नागपूरचे स्वयंसेवक सुध्दा नागपूरातील कामठी, कामठी रोड, कोराडी रोड, वाडी, हिंगणा, बेसा रोड येथील झोपडपट्टीत घरोघरी जावून तांदूळ, तुर डाळ व चना डाळ असलेल्या धान्याच्या किटस् वाटत आहेत. सदर धान्य हे थेट मिल मधून कमी भावात विकत घेतल्यामूळे कमी निधीत जास्त गरजूंना देणे शक्य होत आहे. आतापर्यंत असोसिएनद्वारे 30 क्विंटल तांदूळ, 4 क्विंटल तूर डाळ,4 क्विंटल चना डाळचे वाटप करण्यात आले आहे. तसेच १० अंध दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या बॅक खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत.



रक्तदान शिबीराचे आयोजन
कोविड-१९ च्या काळात मोठया प्रमाणात रक्ताचे तुटवडा निर्माण झाला याचे भान राखून असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोली बुध्दजयंतीचे औचित्य साधून दिनांक ७, मे २०२० रोजी सोनल भडके यांचे मार्गदर्शनार्थ रक्ताचा तुटवडा पडू नये याकरिता रक्तदान शिबीराचे आयोजन केले. कु. कुमारस्वामी, (भावसे) पंडीत राठोड, मिथून राऊत कमलेश राऊत, उमेश बोटावार, युवराज मडावी, धिरज ढेंबरे, रोजेश सुर्यवंशी व इतर ७५ जनांनी रक्तदान करुन शिबीराचे यशस्वीपणे आयोजन केले.
चंद्रपूर जिल्हयात सम्राट कांबळे, नागशेन शंभरकर, अमित चहांदे व सुभाष मेश्राम यांचे नेतृत्वात गरजूंना फळ वाटप,राशन किट वाटप करण्याचे काम मार्च महिन्यापासूनच सुरु आहे.
अमरावती जिल्हयात माधवराज, (भावसे) गजेंद्र नरवणे, (भावसे) यांचे नेतृत्वात गरजूंना राशन किट वाटप करण्याचे काम सुरु आहे.
यवतमाळ जिल्हयात थेट शेतक-यांकडून गहू, चना डाळ,विकत घेवून यवतमाळ येथील गरिब, असहाय,दिव्यांग व्यक्तींना मदत करण्यात येत आहे. यवतमाळ येथे डॉ. किशोर बन्सोड व राजेंद्र दुपारे हे या मदत कार्याची धूरा सांभाळत आहेत.
पुणे जिल्हयात लॉकडाऊन मध्ये बराच भाग प्रतिबंधित व सिल असल्याने तेथे अन्न वाटप करता येत नाही. पुणे येथे थेट गरजुंच्या खात्यात ऑनलॉईन पैसे पाठवून असोसिएशन त्यांची मदत करत आहे. तेथिल मदत कार्याची धूरा सुगत मानकर, डॉ. किरण भगत, डॉ. आर जी. सोमकुवर पंकज गायकवाड हे सांभाळत आहेत.
परिस्थीती सामान्य होईपर्यंत गरजूंना मदत कार्य चालू राहील असे असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज, महाराष्ट्र या संस्थेचे मार्गदर्शक डॉ. किशोर मानकर (भावसे) मार्गदर्शक यांनी कळविले आहे.









