Published On : Sat, Sep 14th, 2019

विधानसभा निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज -अश्विन मुदगल

Advertisement

नागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा व्हिडीओ कान्फरसींग व्दारे निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त्‍ चंद्रभूषण कुमार यांनी घेतला.

विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हयातील विधानसभा मतदार संघात मतदानासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.निवडणूकीसाठी संपुर्ण यंत्रणा सज्ज्‍ असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

Gold Rate
2 May 2025
Gold 24 KT 93,700/-
Gold 22 KT 87,100/-
Silver/Kg 95,400/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय,जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला,अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा ,यासह सर्व नोडल अधीकारी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हयात 4,382 मतदान केंद्र असणार आहेत.मतदारांसाठी आयोगाच्या निर्देशानुसार केंद्रावर सर्व सुविधा देण्यात येणार आहेत.यामध्ये वैदयकीय कीट,विदयुत पुरवठा,मतदारासाठी मदत केंद्र,मतदान केंद्राबाबत माहिती फलक,आदी सुविधा राहणार आहेत.

मतदानाची संपुर्ण प्रक्रीया सुलभपणे पार पाडण्यासाठी 21 हजार 970 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असुन 4 हजार 982 कर्मचारी राखीव ठेवण्यात येणार आहेत.पारदर्शक निवडणुकांसाठी व्हिडीओ सर्व्हीलन्स टिम,फलाईग स्क्वॉड आदीचे गठन करण्यात येणार आहे.

मतदार जागृती मोहीम
मतदारामध्ये जागृती निर्माण करण्यासोबत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत माहिती देण्यासाठी 560 मतदारजागृती कलबची स्थापना करण्यासत आली आहे.या क्लबच्या माध्यतमातुन प्रत्यो गावांमध्ये जागृती मोहिम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिाकरी अश्विन मुदगल यांनी सांगीतले.

शहर तसेच जिल्हयात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस विभागातर्फे आयासेगाच्या निर्देशानानुसार आवश्यक सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.मागील लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे.

निवडणूक विषयक नोंदविण्यात आलेल्या गुन्हयाबाबत आवश्यक प्रक्रीया पुर्ण करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी सांगीतले.

निवडणूकीसाठी अरूंधती पानतावणे ब्रॅड ॲम्बेसेडर-
नवमतदारांमध्ये मतदानाबददल जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती बॅडमिंटनपटू अरूंधती पानतावणे या नागपूर जिल्हयासाठी ब्रॅड ॲम्बेसेडर असणार आहेत.

दिव्यांग मतदारांचा निवडणूक प्रक्रीयेत सहभाग वाढावा यासाठी प्रा.विनोद आशुदानी जिल्हयासाठी आयकॉन्‍ राहणार आहेत.

Advertisement
Advertisement