Published On : Sat, Sep 14th, 2019

जिवनगौरव पुरस्काराचे 1 लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला

विजय फणशीकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

नागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे रा्ष्ट्रीय स्तरावरील पत्रकारिता क्षेत्रात योगदानाबद्दल दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना 2016 साठीचा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला.

लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र व एक लक्ष रुपयाचा धनादेश असे आहे. जीवन गौरव पुरस्काराचे 1 लक्ष रुपये हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात येत असल्याचे विजय फणशीकर यांनी यावेळी सांगितले

पत्रकारितेच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्रकारीते प्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष समारंभात मुंबई येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संपादक विजय फणशीकर या समारंभास उपस्थित राहू न शकल्यामुळे जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांच्या हस्ते हितवाद कार्यालयात त्यांना जीवन गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी हितवादचे प्रबंध संपादक राजेंद्र पुरोहित ,माहिती विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती शैलजा वाघ दांदळे ,कार्तिक लोखंडे. विकास वैद्य आदी उपस्थित होते.