Published On : Wed, Sep 25th, 2019

नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची तयारी पूर्ण – अश्विन मुदगल

Advertisement

नागपूर: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हयातील बारा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगातर्फें शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिध्द होत असून, उमेदवारी अर्ज स्विकारण्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा निवडणुकीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आज घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे, निशिकांत सुके, शिरीष पांडे, तसेच विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
09 july 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver/Kg 1,08,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रसीध्द झाल्यानंतर उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रासंदर्भात पूर्वसूचना देण्यासोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 4 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची सुविधा विधानसभा मतदारसंघ निहाय करण्यात यावी. ही संपुर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवावी, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.

निवडणुकीची अधिसूचना 27 सप्टेबर रोजी प्रसिध्द होत असून, नामनिर्देशन पत्र 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. छाननी 5 ऑक्टोबर रोजी होईल, त्यांनतर 7 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. मतदान 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकीव्दारे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक-2019

निवडणूकीसाठी उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र येथे स्वीकारल्या जातील

Advertisement
Advertisement