Published On : Wed, Oct 6th, 2021

जास्त खड्डे असलेल्या संपूर्ण रस्त्यांचे होणार डांबरीकरण

स्थायी समिती सभापती यांनी घेतला आढावा

नागपूर, : नागपूर महानगरपालिकाच्या स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी नागपुरातील १५ मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे निर्देश स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी (ता ५) रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. स्थायी समितीचा बैठकीत सभापती यांनी नागरिकांना खड्डे पासून होणाऱ्या त्रासाबद्दल व त्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजनाबद्दल माहिती प्राप्त केली. त्यांनी मागच्या स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले होते कि ज्या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे त्या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.

त्यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अभय पोहेकर यांनी सांगितले कि नागपुरातील १५ रस्त्यांचे नवीनीकरण करणयाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. या प्रस्तावानुसार या कामावर १६.१९ कोटीं खर्च होणे अपेक्षित आहे. त्यांनी सांगितले कि सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे नागूरातील महापालिकेच्या मुख्य रस्त्यावर अस्तित्वात असलेले खड्ड्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. निष्कर्षाअंती ज्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, हे खड्डे बुजविणे शक्य नसल्यामुळे अश्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार येत आहे.

स्थायी समिती सभापती यांनी सांगितले की, १२ मीटर अथवा त्यावरील रस्त्यांवर जास्त प्रमाणात खड्डे असलेल्या दहाही झोनअंतर्गत १५ रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मनपा प्रशासनाकडून कार्यवाहीला सुरुवात देखील झाली आहे.