२२ डिसेंबर ला हैद्राबाद येथे पुरस्कार देऊन गौरव होणार
नागपूर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते श्री.अशोक कोल्हाटकर यांना विविध सामाजिक व प्रशासकीय सेवेत जनसंपर्काच्या माध्यमातून समर्पित भावनेतून आणी मानव अधिकार क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबध्दल राष्ट्रीय मानवाधिकार संसाधन विकास संस्थेनी त्यांना या वर्षीचा राष्ट्रीय मानव अधिकार पुरस्कार संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.रमेश आर्य यांनी घोषीत केला आहे.
त्यांना हा पुरस्कार २२ डिसेंबर २०१९ रोजी प्रेस क्लब, बशिरबाग, हैद्राबाद (तेलंगाना राज्य) येथे राष्ट्रीय मानवाधिकार दिन आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
श्री.अशोक कोल्हटकर यांना यापूर्वी पब्लीक रिलेशन सोसायटी ऑफ इंडीया तर्फे उत्कृष्ठ जनसंपर्क अधिकारी म्हणून ही गौरविण्यात आले आहे. तसेच दलीत साहित्य अकादमी नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक साहित्य पुरस्कार सुध्दा मिळालेला आहे. इंदोर येथे महात्मा ज्योतीबा फुले सामाजिक सेवा पुरस्कार देऊन सुध्दा गौरविण्यात आले आहे. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर अर्बन को ऑफरेटीव्ह बँकेचे व बेझनबाग गृहनिर्माण संस्थेचे संचालक सुध्दा आहेत.
महाराष्ट्र राज्य महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी संघटनेचे ते राज्य सचिव आहेत. त्यांनी ब्लू गार्ड, समता जेशिस व महाराष्ट्र ऑफीसर्स फोरम च्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेच्या जनसंपर्क सेवेत असतांना सुध्दा सामाजिक, धार्मीक व मानव कल्याण व संविधान जागृती चळवळीच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जोपासून कार्य केले आहे. त्यांना हा पुरस्कार घोषीत झाल्याबध्दल त्यांची हितचिंतक व मित्र परिवारांनी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे