Published On : Wed, Sep 27th, 2017

आशिष कुंभारे व कुटुंबियांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

नागपूर: सप्टेंबरः नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग 35 अ चे नगरसेवक निलेश कुंभारे यांच्या निधनानंतर प्रभागातील त्यांच्या जागेसाठी फेर निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे भाऊ आशिष यांनी भारतीय जनता पक्षाकडे अर्ज सादर केला होता.

मात्र भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेले उमेदवार संदीप गवई यांना जाहीर केली. तरी आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य असून पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेले उमेदवार संदीप गवई यांना आपला आणि आपल्या कुटुंबियांचा पाठिंबा असल्याचे आशिष कुंभारे यांनी कळविले.

तसेच संदीप गवई यांच्या समर्थऩात आपण खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.