Published On : Wed, Jun 14th, 2023
By Nagpur Today Nagpur News

आशीष देशमुख भाजपचे कमळ पुन्हा हाती घेणार

१८ जून रोजी गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश
Advertisement

नागपूर: आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. माजी आमदार आशीष देशमुख हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या १८ जूनला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थस्टार सभागृहात प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देशमुख हे २००९ मध्ये सावनेर विधानसभेत भाजपकडून पराभूत झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ते काटोलमधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले.

भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले होते. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्ला देणे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे देशमुख यांची काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर देशमुख यांनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी सुरू केल्या होत्या. फडणवीस व बावनकुळे हे देशमुख यांच्या घरी जाऊन आले. तेव्हाच देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होता. अखेर १८ जून रोजी देशमुख भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement
Advertisement