Published On : Sat, Sep 28th, 2019

प्रदेशाध्यक्ष् पदासाठी पक्षाने माझाच विचार करावा: आशिष देशमुख (Ashish Deshmukh)

नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष् बाळासाहेब थारोत हे फक्त संगमनेरचेच प्रदेशाध्यक्ष् आहेत का?अशी परखड टिका नुकतीच काँग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली यावर चांगलेच राळ देखील उठले होते. यावरच राज्यातील एका तरुणाईने फेसबूकवर लाईव्ह टॅलिकास्टमध्ये प्रश्‍न विचारला, तुम्हाला या वक्तव्याबाबत कारवाई होईल अशी भीती नाही का वाटत?त्यावर उत्तर देताना देशमुख म्हणाले की मी पक्ष् सोडून आलेला माणूस आहे. माझ्या वक्तव्याने ते आता पक्षाचा विचार करतील,संगमनेर मधून बाहेर निघतील आणि थाेरात हे कार्यक्ष् म अध्यक्ष् म्हणून महाराष्ट्राला दिसतील,खरे बोलण्याची मला कधीच भीती वाटत नाही. तुमच्या वक्तव्यामुळे थाेरातांचे प्रदेशाध्यक्ष् पद गेले तर काेण चालेल तुम्हाला?या प्रश्‍नावर मिश्‍किलपणे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी प्रदेशाध्यक्ष् पदासाठी पक्ष्ाने माझाच विचार करावा असे उत्तर दिले.

काँग्रेस नगरमधील धनवटे कॉलेजमधील विमलाबाई देशमुख सभागृहात तरुणाईसोबत संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी मंचावरील राजकारण्यांच्या पॅनलमध्ये भारतीय जनता पक्ष्ाच्या शिवानी दाणी तसेच राष्ट्रवादीच्या यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. सभागृहातील तरुणाईने शेतकरी आत्महत्या, बेराेजगारी, वेगळा विदर्भ इ.अनेक प्रश्‍नांवर उपस्थित राजकारण्यांची मते जाणून घेतली. यावेळी बोलताना आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी भाजप हा पोकळ आश्‍वासाने देणारा पक्ष् असल्याची टिका केली. २०१४ च्या निवडणूकीत शेतकरींच्या मालाला हमी भाव, दोन कोटी रोजगार, उद्योगांना महाराष्ट्रात विशेष सुविधा इ.अनेक घोषणा केल्या मात्र गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात तर सोडा विदर्भात देखील उद्योग आले नाही. उलट असलेले रोजगार हे देखील चालले आहेत,चाकण असो की मिहान काहीच प्रगती घडली नाही. काँग्रेसने या पूर्वी एक नंबर राज्य चालवले.यासाठीच थोरातांना बोललो, संगमनेरमधून बाहेर पडा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या.

Advertisement

वगेळ्या विदर्भावर बोलताना देशमुख यांनी फजलअली कमिशननेही वेगळ्या विदर्भाची सिफारीश केली होती. उत्तराखंड,झारखंड,तेलागंणा, छत्तीसगढ झाले मात्र विदर्भ झाला नाही.३७० वर चर्चा होते मात्र भाजप ३७१(सी)वर चर्चा करीत नाही जी विशेषकरुन विदर्भ व मराठवाड्यासाठी संविधानात लागू केली आहे.या विशेष प्रोव्हीजननुसार विदर्भ किवा मराठवाड्याला जास्तीचा निधी द्यायला हवा. नागपूर म्हणजेच विदर्भ आहे का?असा सवाल त्यांनी केला. नागपूरचा विकास म्हणजे भामरागड, गडचिरोलीचा विकास आहे का?संविधानातील तरतूदीनुसार हा जास्तीचा निधी केंद्राने आणि राज्याने या दोन्ही मागास भागांना द्यावा, कलम ३७० चा महाराष्ट्राशी काय संबंध?असा प्रश्‍न देखील उपस्थित केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष् नेता असताना सात वेळा वेगळा विदर्भाचा ठराव विधी मंडळात मांडला होता. खुल्या मनाने बोलतो त्यामुळेच बोलू शकतो,विदर्भाच्या आमदारांच्या भरवश्‍यावरच फडणवीस यांनी महाराष्ट्राची सत्ता मिळवली आहे. केंद्रातील मोदी आणि शहा हे आज देखील विदर्भाच्या भरवश्‍यावरच केंद्रात राज्य करीत असल्याचे ते म्हणाले.

मेगाभरती फक्त इतर पक्षातूनच-
फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून मेगाभरतीची भाषा बोलतात. पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था या विषयी गोष्टी करतात मात्र नोकरीमध्ये मेगाभरती गेल्या पाच वर्षात न होता ती काँग्रेस-राष्ट्रवादीमधून फक्त भाजपमध्येच झाली असल्याची टिका यावेळी आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली.किती शेतकरी यांचे उत्पन्न दुप्पट झाले?कृषि क्ष्ेत्राचा दर सकल उत्पन्नात ४२ टक्के पाहिजे असताना तो मायनस वर आहे. गाड्या विकल्या जात नाही तिथे विदर्भात सीएट टायर कंपनी टाकून कोणता फायदा झाला?भाजप हा फक्त खोट्या भूलथापा देणारा पक्ष् आहे हे मी दोन वेळा अनुभवलं आहे. विदर्भाच्या प्रश्‍नावर देखील या पक्ष्ाने हेच केले.भाजपच्या भूल थापांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणाईला केले., माध्यमांवर दाखवण्यात येणारा सगळा विकास ही नुसती धूळ फेक असल्याचे ते म्हणाले.

देशमुख हे स्वत: कोणत्याही पक्षात सेटल होत नाही-यशोमती ठाकूर
याप्रसंगी तरुणाईशी संवाद साधताना देशमुख हे स्वत:कोणत्याही पक्षात सेटल होत नसल्याची टिका केली.याशिवाय आपला देश हा कृषिप्रधान असल्याचे म्हटल्या जाते मात्र देशातील शेतकरीच अद्याप आत्मनिर्भर झाला नाही.शेतकरी हा आत्महत्येकडे वळला आहे. युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा भीषण आहे. महिलांवर होणारे अत्याचार यांनी परिसीमा गाठली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात लहान-लहान मुली लैंगिक अत्याचाराला बळी पडत आहेत. प्रचारात हे मुद्दे न घेता भाजप हा ३७० कलम वर मते मागत आहे.गडकरी आणि फडणवीस यांनी विदर्भ संग्राम समितीच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले राज्यात सत्ता मिळाली तर वेगळा विदर्भ देऊ्!सत्ता मिळाल्यावर ‘ब्र’देखील काढला नाही.विदर्भाच्या मुद्दावरच भाजप पक्ष्ाला सर्वाकिध जागा विदर्भातून मिळाल्या होत्या. आताही जो पक्ष् वेगळ्या विदर्भाच्या मागे उभा राहील त्याच्याच मागे विदर्भाच्या मतदारांनी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी दिले. भाजप हा जोपर्यंत विदर्भद्रोही शिवसेनेसोबत राहील तोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य देणार नाही असेही त्या म्हणाल्या. आमचे नेते शरद पवार यांनी विदर्भाच्या जनतेला जर स्वतंत्र विदर्भ पाहीजे असेल तर त्यांच्या मागणीला समर्थन देऊ अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. भाजप जर शिवसेनेच्या दडपणात विदर्भ राज्य देणार नसेल तर तशी स्पष्ट भूमिका त्यांनी स्पष्ट करावी.योग्य वेळी देऊ,असे त्यांचे मोघम उत्तराला आता विदर्भातील जनता भूलनार नाही असे त्या म्हणाल्या.

मुनगंटीवर समितीचा अहवाल कधी देणार?
२०१५ साली राज्याचे वित्तमंत्री यांनी विदर्भातील बेरोजगारीच्या प्रश्‍नावर समिती स्थापन केली या समितीने विदर्भातील स्थानिक युवकांना प्रत्येक उद्योगक्ष्ेत्रात २३ टक्के आरक्ष् ण देण्यात येईल असे आश्‍वासन देण्यात आले मात्र आजपर्यंत किती उद्योगात वैदर्भिय तरुणाईला संधी मिळाली?याचा अहवाल कधी देणार?असा प्रश्‍न एका युवकाने शिवाणी दाणी यांना विचारला असता,रोजगार निर्मिती होतेय मात्र त्याचे परिणाम यायला थोडा वेळ लागेल असे दाणी म्हणाल्या.आपली अर्थव्यवस्था ही संक्रमित अवस्थेतून पुढे जात असल्याचे त्या म्हणाल्या. जुनं ते टाकण्याची फेज सुरु असून पारदर्शक व्यवहारांचा काळ सुरु झाला आहे.

एका गतीने अर्थव्यवस्था ही पुढे जाईल मात्र या तात्कालीन फेजला ही आपल्याला सामोरे जाणे गरजेचे आहे.विकास फक्त नागपूरात होत नसून डांबर काढून सिमेंट रस्ते भाजप पक्ष् नाही बांधत आहे. महाराष्ट्रात सर्वदूर विकास दिसून पडत आहे,असे त्या म्हणाल्या.६५ वर्ष काँग्रेसने व नंतर राष्ट्रवादी काँगेससोबत मिळून राज्यात व केंद्रात सरकार चालवली मात्र सावकरांच्या जाळयातून त्या सरकारने शेतकरी यांना काढलेच नाही आणि आता शेतकरी यांचे कैवारी बनत असल्याची टिका दाणी यांनी केली.केवळ कर्ज माफी देऊन प्रश्‍न सुटत नाही.राज्यात जलयुक्त शिवार,शेततळे यांचे जाळे याचा फायदा शेतकरी यांना पुढील दहा वर्षात मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या नेर्तृत्वात हे राज्य आणखी पुढे जाईल.

Advertisement
Advertisement
Advertisement