Published On : Tue, Sep 1st, 2020

राजकारणाच्या एका युगाचा अंत.. — डॉ. आशिष देशमुख.

Advertisement

माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ श्री. प्रणव मुखर्जी यांच्या दुःखद निधनाने एक सच्चा राजकारणी व परिपक्व नेता देशाने गमावला आहे. ते राजकारणाचे अजातशत्रू होते. काँगेसच्या विचारधारेशी ते जुळले होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव व इतर सर्वांसोबत त्यांनी देशाची सेवा केली. संसदेत त्यांचा दबदबा होता.

देशहितार्थ राजकीय मतभेद विसरून त्यांनी सर्व पक्षियांना चांगला सल्ला दिला. देशाच्या आधुनिकतेवर त्यांनी भर दिला. केंद्र सरकारमध्ये त्यांनी मोठ-मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. सर्व पक्षातील नेत्यांचे ते प्रेरणास्रोत होते. त्यांच्या दुःखद निधनाने राजकारणाच्या एका युगाचा अंत झाला, अशी शोक-संवेदना माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे.