| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Feb 9th, 2020

  आशाताई मुळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशीची बावनकुळेंची मागणी

  मेडिकलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची केली चौकशी

  नागपूर: हुडकेश्वर परिसरातील आशा मुळे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करावी व पुन्हा असे गंभीर प्रकार होऊ नयेत यासाठी काटेकोर उपयायोजना कराव्या अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

  माजी पालकमंत्री बावनकुळे यांनी आज दुपारी मेडिकल इस्पितळात जाऊन या विद्यार्थ्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. या प्रसंगी त्यांच्या सोबत माजी पं.स. सभापती अजय बोढारे, नगरसेवक भगवान मेंढे, डॉ. प्रीती मानमोडे, अजय हाथीबेड, मेडिकलचे अधिष्ठाता सेजल मित्र उपस्थित होते.

  शुक्रवारी दुपारी 3 वाजता शालेय पोषण आहार योजनेतून हुडकेश्वरमधील पवारनगर येथे असलेल्या आशाताई मुळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या खिचडीतून विषबाधा झाली. 32 विद्यार्थ्यांना मेडिकल इस्पितळात भरती करण्यात आले व उपचार सुरु करण्यात आले. अजूनही या विद्यार्थ्यांवर मेडिकलमध्ये उपचार करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांपैकी 3 जण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. मेडिकलच्या वार्ड 3, वार्ड 23 व 33 मध्ये विद्यार्थी भरती आहेत. पारडी येथील बचत गटाला खिचडी बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

  या गंभीर प्रकरणी शासनाने लक्ष द्यावे आणि योग्य त्या उपाययोजना करून भविष्यात शाळांमध्ये अशा घटना घडणार याची दक्षता घेतली पाहिजे व दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पााहिजे, अशीही मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145