Published On : Fri, Jan 12th, 2024

नागपुरातील आशा व गटप्रवर्तक आजपासून संपावर

Advertisement

नागपूर : नागपुरातील आशा व गटप्रवर्तक आज, १२ जानेवारीपासून संपावर जाणार आहेत. आंदोलकांकडून या दिवशी व्हेरायटी चौक ते संविधान चौक मोर्चाही काढला जाईल, अशी माहिती आशा व सुपरवायझर (गटप्रवर्तक) कर्मचारी युनियन (सी.आय.टी.यू.) नागपूरतर्फे जाहीर करण्यात आली.

राज्य सरकारने मान्य केलेल्या विविध मागण्यांचा अध्यादेश काढला नसल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले आहे. अल्प मोबदल्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांवर दिवसेंदिवस कामाचा बोझा वाढतच चालला आहे. हे पाहता आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी मानधन वाढीसह इतर मागण्यांसाठी २३ दिवस संप केला. त्यानंतर सरकारने त्यांना वाढीव मानधनासह इतरही आश्वासन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

परंतु यासंदर्भात अध्यादेशही काढला जात नाही. याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे समोर आले. अखेर १२ जानेवारीपासून नागपूर जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संपावर जात आह, असे संघटनेचे राजेंद्र साठे म्हणाले. व्हेरायटी चौकातून संविधान चौक दरम्यान मोर्चाही काढला जाईल.आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. तर १७ जानेवारीपासून संविधान चौकात धरणेही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर यांच्यासह मोठ्या संख्येने आशा वर्कर व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

Advertisement