Published On : Wed, Apr 25th, 2018

आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा, अन्य दोघांना २० वर्षे तुरुंगवास

Advertisement
Asaram Bapu

File Pic

जोधपूर: लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य दोन आरोपींना २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेय. दरम्यान, सुनावणीवेळी हिंसाचार भडकू नये यासाठी जोधपूरपासून दिल्लीपर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जोधपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलंय. रामरहिम खटल्याच्यावेळी हिंसा भडकली होती. तसा प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवलाय.

दरम्यान, आसाराम विरोधात गुजरातमध्ये बलात्काराचा खटला सुरू असल्याने त्याला या प्रकरणात काय शिक्षा होते, याचीही उत्सुकता आहे. दरम्यान, जन्मठेपेची शिक्षा देताना अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात आज बुधवारी जोधपूरमधील न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने आसाराम बापूसह सर्व आरोपींना दोषी ठरवले. त्यामुळे त्यांना शिक्षा काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली.

मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा अल्पवयीन पीडितेचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून बापू न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम आणि सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते.