Published On : Tue, Sep 3rd, 2019

ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या आश्रयदात्या नोरिको ओगावा मॅडम अत्यवस्थ असल्यामुळे अॅड. सुलेखाताई कुंभारे जपानला रवाना

Advertisement

कामठी:- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या उभारणीसाठी महादान करणाऱ्या जापान च्या बौद्ध महाउपासिका नोरिको ओगावा मॅडम या गंभीर आजारी असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी अॅड. सुलेखाताई कुंभारे ह्या आज जपानला रवाना होत आहेत.

सन 1999 ला ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या उद्घाटन प्रसंगी मॅडम कामठी येथे आल्या होत्या. त्यानंतर सन 2000 मध्ये पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा त्यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट दिली होती। मात्र नंतर त्यांच्या आजारपणा मुळे त्यांची दृष्टी गेली व त्यांना दिसणे अशक्य झाले त्यामुळे ओगावा मॅडम भारतात येऊ शकल्या नाहीत।

आता त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांची अतिम अंतिम इच्छा होती कि त्यांच्या शेवटच्या क्षणी अॅड. सुलेखाताई कुंभारे या त्यांच्यासोबत असाव्या, त्यांच्या परिवाराने विनंती केल्यामुळे अॅड. सुलेखाताई कुंभारे या तातडीने आज जपानला रवाना होत आहेत.

उल्लेखनीय आहे की विशवविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे जपान व भारत यांच्या मैत्रीसाठी सुप्रसिध्द असून शांती, मैत्री व कल्याणकारी विचाराचे प्रतीक म्हणून प्रसिध्द आहे.

संदीप कांबळे कामठी