Published On : Tue, Mar 5th, 2019

सायंटिफिक सभागृहामध्ये कलादालनच्या गायकांची ‘ सुरमई शाम

Advertisement

नागपूर: स्वरगंगेच्या काठावरती, कितना प्यारा वादा यासारख्या हिंदी-मराठी गीतांची सफर कलादालनच्या गायकांनी घडवली आणि रसिकांची सोमवारची संध्याकाळ ‘सुरमई’ केली. कलादालनतर्फे ‘सुरमई शाम : भाग दोन’ या हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी सायंटिफीक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संकल्पना कलादालनच्या अध्यक्ष माधवी पांडे यांची होती तर संगीत संयोजन परिमल जोशी यांचे होते. डॉ. मनोज साल्पेकर यांनी निवेदन केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकील अहमद, कृष्णा भोयर, रेखा साने, गायक सागर मधुमटके व संजिवनी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रफुल्ल शहा यांची विशेष उपस्थिती होती. श्रीकांत सप्रे, मंगेश पवार, सवित्रू पोफळी, रमेश चवळे, डॉ. रवी वानखेडे, चेतन एलकुंचवार, डॉ. अनिल चिव्हाणे, संगीता रॉय कर्माकार, प्रज्ञा खापरे, समा सोलव, अश्विनी देवधरे या गायकांनी बहारदार गीते सादर केली. सागर मधुमटके जे किशोर कुमार च्या नावानी फेमस आहेत।या कार्यक्रमामध्ये त्यांनी पण गानी गायली।कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब गजभिये व माधवी पांडे यांनी केले होते.

वेंटीलेटर चित्रपटातील ‘या रे या’ या सामूहिक गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर रमेश चवळे यांनी स्वरगंगेच्या काठावरती हे गीत सादर करून रसिकांच्या वाहवा मिळवली. न मूँह छिपा के जियो हे विजय पांडे यांनी गायिलेले गीत आणि आंखो से तुने ये क्या कह दिया हे मंगेश पवार व संगीता यांनी गायिलेले युगल गीत रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले. श्रीकांत यांनी सादर केलेल्या ए मेरे वतन के लोगो या गीताने सभागृहात देशभक्तीचे वातावरण तयार केले. समा सोलव यांनी सोला बरस की हे गीत सादर करीत टाळ्या घेतल्या. पाहिले न मी तुला, चलत मुसाफिर अशा गीतांचा मेडले सवित्रू पोफळी यांनी सादर करून कार्यक्रमात रंगत भरली. सुरमई शाम इस तरह आये हे शीर्षक गीत डॉ. रवी वानखेडे यांनी सादर केला।

त्यानंतर सोचेंगे तुम्हे प्यार करके नही, दिल ऐसा किसी ने मेरा तोडा, लेकर हम दिवाना दिल, युही तुम मुझसे बात, याद किया दिल ने, ऐ गुलबदन, तेरे बिना जिंदगी से शिकवा, मै आया हॅ, सुन बेलिया, सलामें इश्क, गुनगुना रहे है भवरे, तेरे दिल में है क्यात बात, निल गगन में उडते बादल, दिल की नजरसे, तेरे मिलन की ये रैना इक चतुर नार, सारे शहर में, अशी एकाहून एक सरस गीते गायकांनी यावेळी सादर केली.

रुक जा ऐ दिल दिवाने या श्रीकांत यांनी गायिलेल्या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सादरीकरणासाठी ‘बेस्ट सिंगर’ चा किताब पण देण्यात आला. प्रदन्या खापरे नी पहिला पुरस्कार जिंकला। गायकांना प्रेक्षकांसमोर गाणे सादर करण्यापूर्वी कशी तयारी करावी लागते, याचा अनुभव मिळावा व त्यांना मंच मिळावा हा या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे माधवी पांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले