Published On : Sat, Oct 14th, 2017

जॅग्वारने आणली आहे नागपूरसाठी ‘आर्ट ऑफ परफॉर्मन्स टूर’


नागपूर : अॅम्बी व्हॅली येथे आर्ट ऑफ परफॉर्मन्स टूरचे यशस्वी आयोजन करण्यात आल्यानंतर पुणे, अहमदाबाद, इंदूर, जयपूर, गुरुग्राम, कर्नाल, चंडीगढ, नोईडा, लखनौ, बंगळुरू, चेन्नई, विजयवाडा आणि हैदराबाद येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता ग्राहकांना अद्वितीय असा ड्राइव्ह अनुभव देणाऱ्या आर्ट ऑफ परफॉर्मन्स टूरचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले आहे. या डायनॅमिक टूरमुळे ग्राहकांना जॅग्वार कारमध्ये काय दडलंय, याची माहिती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवण्याची संधी मिळणार आहे.


जॅग्वार हा आयकॉनिक ब्रँड आपल्याकडे असावा, अशी अपेक्षा असलेल्या मान्यवरांना जॅग्वारतर्फे सादर करण्यात आलेल्या या अद्वितीय उपक्रमाद्वारे जॅग्वारच्या आरामदायी आणि अनोख्या सोयीसुविधा अनुभवण्याची संधी दिली जाणार आहे. जॅग्वारच्या संपूर्ण श्रेणीतील वाहने म्हणजेच एक्सई, एक्सएफ, एक्सजे, एफ-पेस आणि एफ-टाइप यांसारख्या कारचा अनुभव ग्राहकांना घेता येणार आहे. खुल्या धावपट्टीवर विशेष करून तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम १४ आणि १५ ऑक्टोबर रोडी मिहान रोड, मिहान, नागपूर, ४४११०८ येथे रंगणार आहे.