Published On : Tue, Sep 3rd, 2019

रामटेक नगरीत घरोघरी गणरायाचे आगमन

ढोलताशांच्या गजरात बाप्पा विराजमान

रामटेक: रामटेक नगरीत व तालुक्यातील विविध भागात घरघुती व सार्वजनिक गणपतीचे वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले. सकाळपासूनच तरुणांपासून तर प्रौढांपर्यंत सर्वांचीच गणपतीची मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती.ग्रामीण भागातील तरुण मंडळी सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तीसाठी सकाळपासूनच घाईत होती.

Advertisement

सार्वजनिक ठिकाणी सायंकाळच्या वेळी तर घरोघरी सकाळपासून मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजेला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून रामटेक व परिसरातील तरुण पिढी रोजगाराच्या निमित्ताने शहरात असल्याने तेही गणपती उत्सवासाठी गावी परतली असून ती उत्सवात आनंदाने सहभागी झाली आहेत.

रामटेक व परिसरातील गावातील गणेश मंदिर व इतरही मंदिरावर आकर्षक रोषणाई केली असून अनेक वर्षांपासून जी गणेशोत्सव मंडळ सातत्याने गणेशोत्सव साजरा करीत आहेत त्यांच्याकडून या काळात विविध सृजनशील स्पर्धा,सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असून कार्यकर्ते मंडळी गणेशोत्सव लोकाभिमुख व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखंड परिश्रम करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement