नागपूर – भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांचे आगमन अत्यंत औपचारिक आणि सन्मानपूर्वक वातावरणात झाले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्यासह विविध वरिष्ठ न्यायालयीन अधिकारी आणि प्रशासकीय पदाधिकारी उपस्थित होते.
सरन्यायाधीश गवई यांच्या नागपूर दौर्याला विशेष महत्त्व असून, न्यायालयीन कामकाज व प्रशासकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भेटीला महत्त्व दिले जात आहे. या दौर्यानिमित्त काही महत्त्वाच्या बैठकी तसेच न्यायालयीन अधिकाऱ्यांशी चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.









