Published On : Fri, Oct 11th, 2019

भेसळ तेल विक्री करणाऱ्या तेल दुकानावर धाड, 61 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपिवर गुन्हा दाखल

कामठी :- निरोगी शरीर राहण्याच्या उद्देशाने जेवणात वापरण्यात येणारा खाण्याचा तेल हा महागडा येत असला तरी नामवंत कंपनीचा असलेल्या शुद्ध रिफाईंड सोयाबीन तेल चा वापर करीत असतात याचाच फायदा घेत कामठी येथील काही दुकानात फॉरचुन नामक तेल कंपनीच्या नावावर फॉरचून कंपनीचे सॅम्पल लावून बनावट तेल विकत असल्याची गुप्त माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसानी जुनी ओली कामठी परिसरातील दुकानात घातलेल्या धाडीत 20 लिटर प्रमाणे 22 फॉरचून तेलाचे डब्बे किमती 42 हजार 900 रुपये , 20 सी क्षमतेचे फॉरचुन चे खाली टीनाचे 15 डब्बे किमती 450 रुपये, , 90-90लिटरचे लूज ऑइल असलेले दोन ड्रम किमती 18 हजार रुपये असा एकूण 61 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची यशस्वी कारवाही काल 10 ऑक्टोबर ला रात्री 8 वाजता करण्यात आली असून यातील दोन आरोपीवर गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आले.

अटक आरोपीमध्ये महेश दौलतराम कृष्णांनी वय 49 वर्षे , राकेश किशोर कृष्णानो वय 32 वर्षे दोन्ही राहणार जुनो ओली कामठी असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सना सुदीच्या दिवसाला सुरुवात झाली असून या दिवसात व्यवसायोक वर्ग भेसळ अन्न पदार्थाची विक्री करून सर्रास लोकांच्या जीवाशी खेळ खेळतात यातच शरीराच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट ठरत असलेले फॉरचून रिफाईंड सोयाबीन तेल हे अधिकाधीक वापरन्यात येत असतो

मात्र या फॉरचून रिफाईंड सोयाबीन तेल च्या सॅम्पल वर बनावटी तेल विक्री होत असल्याच्या गोरखधंदा कामठीत मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची गुप्त माहीती दक्षता कंपनीकडून द्रक्षयानी कँपनित काम करोत असलेल्या इन्व्हस्टोगेशन ऑफिसर ला कळताच इन्वेस्टीगेशन ऑफिसर फिर्यादी दिलीपकुमार राधेश्याम सुवर्णकार वय 37 वर्षे रा चेंबूर कॉलोनी कामठी ने स्थानिक पोलिस स्टेशन च्या पथकाला सोबतीला घेऊन जुनी ओली कामठी येथील कैलास ट्रेडर्स व ओम किराणा स्टोर्स मध्ये धाड घातली असता फॉरचून कंपनीच्या नावाखाली खाण्याचा नकली तेल विकत असल्याचे नोंदर्शनास आले या धाडीतून 61 हजार 350 रुपयाचा मुद्देमाल जप्त करोत उपरोक्त दोन आरोपीवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आले.ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवोदास कठाळे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे कामठी