Published On : Mon, Apr 19th, 2021

मानकापुर घाटावर बोरवेलची व्यवस्था

नागपूर : प्रभाग ११ च्या नगरसेविका श्रीमती संगीता गि-हे यांचा विनंतीवरुन जलप्रदाय समिती सभापती श्री. संदीप गवई यांनी मानकापुर घाटावर अंत्यविधीसाठी येणा-या नागरिकांसाठी बोरवेलची व्यवस्था केली. अंत्यविधीकरीता पाण्याची सोय नसल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत होता.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता श्री. गवई यांनी प्रशासनाला तात्काळ बोरवेल करण्याचे आदेश दिले. रविवारी संध्याकाळपर्यंत बोरवेल करण्यात आली तसेच हैंडपंपसुध्दा लावण्यात आले. त्याबद्दल नगरसेविका श्रीमती संगीताताई गि-हे व समस्त नागरिकांनी जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई यांचे आभार मानले.