Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 27th, 2021

  सात महिन्यात साडे पाच हजारावर अतिरिक्त खाटांची व्यवस्था

  आय.सी.यू.चे बेड्‌समध्ये १८१७ ने वाढ : अजून व्यवस्था वाढविण्यासाठी मनपा प्रयत्नरत

  नागपूर :मागच्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये आलेल्या लाटमध्ये नागपूर शहरात कोव्हिड रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती. तेव्हा नागपूर शहरात सरकारी आणि विविध खासगी रुग्णालय मिळून केवळ १५१४ खाटांची व्यवस्था होती. सप्टेंबरनंतर आता एप्रिल २०२१ मध्ये कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. दरम्यान, मनपा प्रशासनाने उद्‌भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेऊन खाटांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात यश आले असून सुमारे साडे पाच हजारांनी खाटा वाढल्या आहेत. सध्या नागपूर शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेडसंख्या ७१४४ इतकी झाली आहे.

  २८ सप्टेंबर २०२० मध्ये केवळ १५१४ बेड्‌स विविध रुग्णालयात उपलब्ध होते. त्यामध्ये ऑक्सीजनची उपलब्धता असलेले ११४४, आय.सी.यू.मध्ये ३१६ तर व्हेंटिलेटर सपोर्ट असलेले २३६ बेड्‌स उपलब्ध होते. यानंतर प्रत्येक महिन्यात ही संख्या वाढविण्यात आली. ३१ डिसेंबर २०२० रोजी ३९९३ बेड्‌स रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यात ऑक्सीजनसह २६७३, आय.सी.यू.मध्ये १२०८ तर व्हेंटिलेटर असलेल्या ३४९ बेड्‌सचा समावेश होता. ३१ जानेवारी २०२१ रोजी एकूण बेड्‌सची संख्या ३९१० झाली. तसेच २८ फेब्रुवारी रोजी ३९१३, बेड्‌स ३१ मार्च रोजी ४६८२ बेड्‌स, १२ एप्रिल रोजी ५५५३ बेड्‌स तर १८ एप्रिल रोजी ६३८७ बेड्‌स इतकी एकूण बेड्‌सची उपलब्धता नागपूर शहरात झाली. यानंतरही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात मनपाचे प्रयत्न सुरूच आहेत. २४ एप्रिल रोजी एकूण बेड्‌सची संख्या ७१४४ इतकी झाली आहे. अर्थात सप्टेंबर २०२० नंतर ५६३० बेड्‌स वाढविण्यात आले आहेत. सध्या नागपूर शहरात ४६५३ बेड्‌स ऑक्सीजनसह असून २११३ बेड्‌स आय.सी.यू.चे आहेत तर ५४२ बेड्‌स व्हेंटिलेटर्सचे आहेत. ही संख्या पुन्हा वाढणार असून यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

  आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा : महापौर
  सध्या नागपुरातील कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन बेड्‌सची संख्या वाढविण्यावर आम्ही भर देत आहोत. बेड्‌सची उपलब्धता असली तरी ऑक्सीजनची व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या बेड्‌सचा उपयोग नाही, त्यामुळे ऑक्सीजनची व्यवस्था करण्यावर आम्ही भर देत आहोत. यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेता श्री. देवेन्द्र फडणवीस यांनी सुध्दा ऑक्सीजन टँकर उपलब्ध केले आहे. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या सहकार्याने व्हेंटिलेटर्सचीही व्यवस्था करण्यात येत आहे. संपूर्ण प्रशासन कामाला लागले असून उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत. नागरिकांनीही यात संयमाची भूमिका ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145