Published On : Mon, Jan 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

लाडकी बहिण योजनेतील ३० लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर?मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या…

नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख महिलांना हा लाभ मिळाला तर दुसऱ्या दिवशी १ कोटी २५ लाख महिलांना लाभ मिळाला.

दरम्यान, या योजनेतील ३० लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू आहे.मात्र, या अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. त्या रायगड येथे प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

Gold Rate
Friday 07 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

३० लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहेत, याबाबत आदिती तटकरे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, मला माहीत नाही हा आकडा कुठून येतो. पण माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही बातम्या आणि अफवांना बळी पडू नका. २ कोटी ४१ लाख महिलांच्या खात्यात लाभ थेट हस्तांतरण करण्यात आले आहे.

जुलै २०२४ च्या पावसाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, अटी शर्थींच्या आधारे सरकारने महिलांकडून अर्ज भरून घेतले अन् पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सहा हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, तर जानेवारीचा सातवा हप्ताही पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Advertisement