Published On : Wed, Feb 7th, 2018

सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर, नागपूर स्थित तरोडी येथील प्रस्तावित प्रकल्पास मंजुरी

Advertisement

नागपूर: केंद्र शासनाने जाहीर केलेल्या “सर्वांसाठी घरे २०२२” या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आज नवी दिल्ली येथील निर्माण भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मुलन मंत्रालयांच्या झालेल्या बैठकीमध्ये नागपूर स्थित ख.क्र. ६२, मौजा. तरोडी (खुर्द) ता. कामठी, जिल्हा. नागपूर येथे प्रस्तावित प्रधानमंत्री आवास योजना करिता केंद्र शासनाद्वारे मंजुरी प्रदान करण्यात आली. सदर प्रकल्पाची मंजुरी राज्य शासनाकडून २४ जानेवारी २०१८ रोजी मिळाली असून केंद्र शासनाच्या मंजुरी करीता राज्य शासनाद्वारे हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला देखील आज मंजुरी मिळाली असून सबब योजनेच्या निर्माण कार्यास लवकरच सुरवात होईल हे म्हणण्यात काही हरकत नाही. नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाकरिता विविध पातळीवरील मंजुरी प्राप्त करून घेण्यात व सबंधित जमिनीचे आरक्षण स्थानांतरीत करून घेण्यात यश प्राप्त केले व कमीत कमी वेळेत हा प्रकल्प मंजूर झाला जे नव्कीच कौतुकास्पद आहे.

राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचेतर्फे या प्रकल्पाकरिता विविध पातळीवर सतत पाठपुरवठा करण्यात आला होता ज्यामुळे आज प्रकल्पास मंजुरी मिळण्यात यश प्राप्त झाले आहे.

नासुप्रद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल (E.W.S.)घटकातील नागरिकांना लाभ मिळणार असून प्रस्तवित मंजूर प्रकल्प ४.३४ हेक्टर जागेवर नासुप्र द्वारे ९४२ गाळ्यांचे निर्माण करण्यात येणार आहे व सदर इमारत जी + ४ या स्वरूपात राहणार असून एका इमारतीमध्ये ४० ई.डब्ल्यू.एस. घरकुले व प्रत्येक मजल्यावर ८ ई.डब्ल्यू.एस. घरकुले निर्माण केल्या जाईल. या घरकुल योजनेचे निर्माण कार्य कन्व्हेन्शनल टेव्कनॉलॉजीने केल्या जाणार असून, याठिकाणी बेडरूम, किचन, हॉल व प्रसाधनगृहाचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पातील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ‘सर्व सुविधायुक्त अशी घरे’ या दृष्टीने ह्या प्रकल्पाला बघितल्या जात आहे. ज्यामध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेन, सिवर लाईन, डब्ल्यूबीएम रोड, साईट डेव्हलपमेंट, सोसायटी कार्यालय, कंपाउंड वॉल,रुफ सोलर पावर, रेन वॉटर हार्व्हेस्टिंग इत्यादी गोष्टींचा समावेश याठिकाणी राहणार आहे. या प्रकल्पातील गाळ्यांची अनुमानित किमंत प्रत्येकी ७.५ लाख आखल्या गेली आहे व यावर राज्य शासनाकडून २.५ लाखाच्या अनुदानाचा समावेश देखील आहे.


नासुप्र द्वारे सध्यास्थितीत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मौजा वाठोडा येथे २६४ आणि ख.क्र. ६३, मौजा.तरोडी (खुर्द) येथे २३७४ गाळ्यांचे निर्माण कार्य सुरु झाले असून, मौजा वांजरी येथे ९६० गाळ्यांचे निर्माण कार्य लवकरच सुरु होणार आहे.