नागपूर : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सिद्धीविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने आमदार संदीप जोशी यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग 16 ड यांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बुक बँक लोकार्पण सोहळा सायंटिफिक सभागृहात उत्साहात पार पडला.
या विशेष कार्यक्रमात दहावी, बारावी व अन्य शाखांमधील परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ‘बुक बँक’ या उपक्रमाचेही लोकार्पण करण्यात आले, ज्याचा उद्देश गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे हा आहे.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नाथे पब्लिकेशनचे संजय नाथे, सराफ क्लासेसच्या संचालिका सुषमा सराफ, वानखेडे क्लासेसचे संचालक नरेंद्र वानखेडे, माजी नगरसेवक लखन येरावार, माजी नगरसेविका नीलिमा बावणे, ‘आयकॅड’चे संचालक सारंग उपगन्लावार, भाजप धंतोली मंडळ अध्यक्ष विनोद शिंदे, उषा निशितकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात ‘करिअरच्या वाटा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. नरेंद्र वानखेडे, संजय नाथे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना यशस्वी भवितव्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन नीरज दोंतुलवार यांनी केले. गजानन निशितकर, जयंत आदमने, अमोल वटक, प्रणव घुगरे, श्रीधर जलताडे सुहास बारई आनंद टोळ, राजीव रोडी, भरत गौरकर, संजय देशपांडे, श्री. व सौ. राधिका जलताडे वंदना शर्मा, कविता देशमुख, हेमा आदमने, संध्या अढाळ, पुष्पा शिन्दे, बेबीसिंग, अल्का इंदुरकर, रश्मी अवघडे, साधना शुक्ला, सरिता सनोडीया, कल्पना शुक्ला, नंदा चौधरी, मनोज फणसे, राजाभाऊ ठकनाईक, हेमंत कुलकर्णी, शरद राठी, आनंद माथनकर, राजु राऊत कीर्ति पुराणिक, निरंजन गाडगीळ, नितीन येते, श्रवण वर्मा, राहुल सुराणा, आशीष गुप्ता आदींनी सहकार्य केले.
विद्यार्थी, पालक आणि नागरिक यांची उत्स्फूर्त उपस्थिती हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बुक बँकसारख्या उपक्रमांमुळे सामाजिक जाणिवेतून शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम प्रशंसनीय ठरला.