Published On : Tue, Jun 29th, 2021

यंग ब्रिगेड शहर अध्यक्षपदी भोकरे यांची नियुक्ती

कामठी :-कांग्रेस सेवादल च्या बळकटी करणाच्या उद्देशातून कांग्रेस सेवादलच्या यंग ब्रिगेड नागपूर जिल्हा अध्यक्ष सचिन चिकटे यांनी कांग्रेस सेवादल च्या यंग ब्रिगेड कामठी शहर अध्यक्षपदी प्रभाग क्र 16 चे रहिवासी आकाश प्रदीप भोकरे यांची नियुक्ती करण्यात आली.हे नियुक्तीपत्र कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेशभाऊ भोयर यांच्या शुभ हस्ते देण्यात आले.

याप्रसंगी कांग्रेस सेवादल चे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव राजकुमार गेडाम, नगरसेवक मो आरिफ, कांग्रेस सेवादल चे माजी शहर अध्यक्ष प्रमोद खोब्रागडे, सोहेल अंजुम, अब्दुल सलाम अन्सारी, आदी उपस्थित होते.

या नियुक्तीबद्दल नवनियुक्त कांग्रेस सेवादल यंग ब्रिगेड कामठी शहर अध्यक्ष आकाश प्रदीप भोकरे यांनी कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेशभाऊ भोयर, कांग्रेस सेवादल चे नागपूर जिल्हा ग्रा अध्यक्ष तुळशीराम काळमेघ, प्रदेश सहसचिव राजकुमार गेडाम , कांग्रेस सेवादल यंग ब्रिगेड चे नागपूर जिल्हा अध्यक्ष सचिन चिकटे यांचे प्रामुख्याने आभार मानले.