कामठी :-संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती ही बिकट झालेली आहे त्यातच आपला भारत देश हा कोरोणामुक्त व्हावे यासाठी शासनाच्या वतीने कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून कोरोनामुक्तीसाठी लसीकरण हाच एक ऊत्तम पर्याय आहे.
या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यात काही भामटे लसीकरण संदर्भात खोटी अफवा पसरवून लोकांना लसीकरण लावण्यापासून वंचित ठेवत आहेत .
एकीकडे शासन कोरोनामुक्त देश निर्माण करण्यासाठी लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून मोहीम राबवित आहेत मात्र काही भामटे याला गालबोट लावून लसीकरण लावण्यापासून वंचित ठेवण्याचे कार्य करीत असल्याने अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या व्यक्ती विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना शासकीय अनुदानाचा फायदा थांबविण्यात यावा या मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने नागपूर जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल बावनकुळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार ला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी श्यामु महेंद्र, विनोद झलक, किसन चव्हाण, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
