Published On : Sun, Oct 28th, 2018

जुनी पेंशन लागू करा व २३/१० चा शासन निर्णय रद्द करा

Advertisement

रामटेक: सध्या शिक्षकांचे विविध प्रश्न निर्माण होत असून त्यावर शासनाने तोडगा काढणे गरजेचे झालेले आहे.महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन शाखा रामटेकच्या वतीने नुकतीच रामटेक येथे पत्रकार परिषदेत आपल्या विविध मागण्यानची माहिती दिली.

३१ ऑक्टोबर,२००५ नंतरच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेंशन योजना (१९८२-८४) लागू करा, केंद्रशासन कर्मचाऱ्याप्रमाणे मृत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना(२००९) लागू करा, सेवा उपदान (ग्रॅज्युटी २०१६) लागू करा इत्यादी प्रमुख मागण्यांसह शिक्षण विभागा करीता काढलेला २३/१०/२०१७ चा चटोपाध्याय वेतनश्रेणी बाधित करणारा शासन निर्णय रद्द करा; या संदर्भात ही परिषद घेण्यात आली.

जर असे करण्यास शासनाने टाळाटाळ केली तर येणाऱ्या निवडणुकीत कर्मचारी असंतोष व शासनाकडून होणारी आर्थिक पिडवणुक यांचे दुष्परिणाम भविष्यात उग्रपणे दिसून येतील असा गर्भित ईशाराही यावेळी संघटनेमार्फत देण्यात आला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम हटवार, तालुका अध्यक्ष विकास गणविर, सहसचिव दिलीप ढोमणे यांनी सांगितले की मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येणार असल्याचा इशारा ह्यावेळी देण्यात आला.पत्रकार परिषदेत सर्व तालुका संघटक- नरेंद्र इनवाते,हेमराज बनकर,चंद्रकांत चकोले,पवन कामडी, संदीप उरकुडे, राजीव राऊत, सुहास महाजन इत्यादी शिलेदार हजर होते.