आशिष देशमुख यांना निवडून देण्याचं जनतेला बघेल यांचं आवाहन
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री भुपेशजी बघेल यांची दंतेश्वरी नगर येथे सभा घेण्यात आली. श्री. बघेल म्हणाले, ही लढाई जनतेची स्वतःची आहे, डॉ. आशिष देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस नाही.
स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा व डॉ. आशिष देशमुख यांना निवडून आणा.
भाजपा गांधीजींची 150 वी जयंती साजरी करतात परंतु गोडसे यांचा धिक्कार करत नाही. भाजपा संधीसाधू आहे त्यामुळे आता काँग्रेसला संधी देणे गरजेचे आहे. डॉ. आशिष देशमुख यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. आशिष देशमुख यांनी सुद्धा भाजप वर सडकून टीका केली.
Advertisement

Advertisement
Advertisement