Published On : Tue, Sep 1st, 2020

जेईई परिक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

नागपूर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली मार्फत आयोजित Joint Entrance Examination JEE (Main)-2020 दिनांक 1 ते 6 सप्टेंबर, 2020 या कालावधीत नागपूर येथील सहा केंद्रावर पहिले सत्र सकाळी 9 ते 12 व दुसरे सत्र दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत आयोजित केलेली होती. तथापि, पूरपरिस्थितीमुळे परिक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सद्य:परिस्थितीत हवामान खात्याचे सूचनेनुसार वादळी वारा, पाऊस, अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे व त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तथापि, पूरपरिस्थितीचे कारणामुळे उक्त परिक्षेला बसणाऱ्या कोणत्याही परिक्षार्थीस त्याला नेमूण दिलेल्या दिनांकी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे शक्य न झाल्यास याबाबत परिक्षार्थी यांनी स्वत: लेखी निवेदन उक्त परिक्षेकरीता राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांचेकडून नियुक्त केलेल्या जिल्हास्तरीय एजन्सीमार्फत राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नवी दिल्ली यांचेकडे दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे