
File Pic
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकपाल नियुक्त न केल्याने त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यांनी सरकारवर कुठलेही पाऊल न उचलल्याचा आरोप लावला आहे. या पत्रात मात्र त्यांनी कधीपासून आंदोलन करणार याचा उल्लेख केलेला नाही. यूपीए सरकारच्या काळात अण्णांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन केले होते.
काय लिहिलंय अण्णा हजारेंनी चिठ्ठीत
अण्णांनी मोदींना लिहिले आहे की ते लवकरच रामलीला मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. याची तारीखही लवकरच जाहीर करण्यात येईल. अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोपर्यंत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात येत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन करण्यात येणार आहे. लोकायुक्तांच्या नियुक्तीवरही त्यांनी जोर दिला आहे.
सरकारवर केलाय काय आरोप
अण्णांनी सरकारच्या बोलण्यात आणि वागण्यात खूपच अंतर असल्याचे म्हटले आहे. मार्च महिन्यातही अण्णांनी चिठ्ठी लिहून मोदी सरकार भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप लावला होता.
अण्णांनी याबाबीकडे लक्ष वेधले आहे की, ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे त्या ठिकाणी लोकायुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारची तीन वर्षे पूर्ण झाली असून अजुनही सरकार भ्रष्ट्राचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप त्यांनी लावला.
2011 मध्ये बनवला होता सरकारवर दबाव
अण्णांनी 2011 मध्ये रामलीला मैदानावर आंदोलन केले होते. त्यानंतर संसदेत लोकपाल बिल पास झाले होते. मोदी सरकार लोकपाल नियुक्ती करण्यासाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. त्यामुळे अण्णांपुढे आंदोलनाशिवाय कोणताच मार्ग उरलेला नाही.