Published On : Mon, Aug 26th, 2019

‘सौरभ सोमकुवर ‘ खून प्रकरणात अजुन एका आरोपीस अटक

कामठी : स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पोरवाल कॉलेज जवळील सम्राट नगर परिसरात सौरभ सिद्धार्थ सोमकुवर नामक 19 वर्षोय तरुणाचा दिवसाढवळ्या दुपारी 2 च्या सुमारास निर्घृण खुन केल्याची घटना 20 ऑगस्ट ला घडली होतो या खून प्रकरणातील दोन मारेकऱ्यांना घटनेच्या दिवशीच अटक करोत न्यायालयाने दिलेल्या आदेशानव्ये 27 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळविली होती या पोलीस कोठडीत असलेले दोन आरोपी रोशन रमेश सकतेल वय 34 वर्षे व राजू छोटेलाल सकतेल वय 45 वर्षे दोन्ही राहणार सैलाब नगर कामठी याना पोलिसांनी दाखविलेल्या खाकी हिसक्यात उप्पलवाडी ला लपवून ठेवलेली दुचाकी तसेच खून करण्यात आलेले दोन धारदार शस्त्र जप्त करण्यात आले

तसेच सह आरोपी असलेल्या आरोपींची सुद्धा नावे सांगितली आहेत यातील हे आरोपी पसार असून आज सकाळी आपल्या राहत्या घरी आला असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सकाळीच या आरोपीच्या घरी धाड घालून आरोपीस अटक करण्यात आले यानुसार अजून एका आरोपीची वाढ करण्यात आली असून अटक तिसऱ्या आरोपीचे नाव दीप उर्फ कालु रमेश सकतेल वय 40 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.

या आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता 27 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी मिळवली.तसेच आरोपिकडून विना नंबर ची एक दुचाकी जप्त करन्यात आली यानुसार या खून प्रकरणात एकूण तीन आरोपीसह गुन्ह्यात वापरलेले विना नंबर चे असलेले नवीन दोन दुचाकी तसेच दोन धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.

ही यशस्वी कारवाहो डीसीपी निलोत्पल, एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस उपनिरीक्षक धोंगडे, डी बी स्कॉड चे ज्ञानचंद दुबे, मंगेश गिरी, वेदप्रकाश यादव, वाघ आदीनो केली असून पुढील तपास सुरू आहे तर खुन करण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे तसेच यामध्ये अजून आरोपींची वाढ होणार असल्याची गुप्त माहिती आहे,.

संदीप कांबळे कामठी