Published On : Tue, Sep 22nd, 2020

ड्रैगन पैलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर कामठी च्या वर्धापनदिनी सामुहिक ध्यान साधना

परिसरात अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते १००० झाडे परिसरात लावण्याचा शुभारंभ

कामठी : नागपुर जिल्ह्यातील कामठी येथे जगविख्यात ड्रैगन पैलेस टेंपल च्या बाजुला असलेल्या ड्रैगन पैलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर च्या वर्धापनदिनी ड्रैगन पैलेस टेंपल च्या शिल्पकार अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी साधकांच्या उपस्थितीत ध्यान साधनेत भाग घेतला.आजपासून कामठी येथे १० एकर जागेवर २ वर्षापूर्वी २२ सप्टेंबर २०१७ ला देशाचे महामहिम राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तसेच राज्यपाल विद्यासागर राव, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ड्रैगन पैलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर चे कामठी येथे उद्घाटन झाले होते हे विशेष उल्लेखनीय आहे.

विपश्यना मेडिटेशन सेंटर मध्ये नियमितपणे १० दिवस, ३ दिवस आणि दर पोर्णिमा च्या निमित्ताने विपश्यना शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिरात देशभरातून शेकडो साधकांनी या विपश्यना शिबिराचा लाभ घेतला आहे. या भव्य मेडिटेशन सेंटर मध्ये २ प्रशस्त भव्य सभागृह सामुहिक ध्यान साधनेसाठी उपलब्ध असुन ३२ शुन्यागार स्वतंत्र ध्यानसाधनेसाठी तर ७२ स्वतंत्र खोल्या ध्यानसाधनेसाठी उपलब्ध आहेत. तर १०० साधकांसाठी निवासी व्यवस्था आहे. त्या व्यतिरिक्त डायनिंग हॉल आणि सेंटरलाईज कम्युनिटी किचन आदी सुविधा उपलब्ध आहेत.

म्यांमार हुन विशेषतः ५ आकर्षक अंब्रेला (छत्र्या) या ठिकाणी ध्यान आकर्षण करतात. कामठी येथे उभारलेल्या या आगळ्यावेगळ्या ड्रैगन पैलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर च्या स्थापत्य कलेचे मा. महामहिम रामनाथ कोविंद यांनी विशेष कौतुक केले होते. मागील मार्च २०२० ला भारतात आलेल्या कोरोना संकटामुळे सध्या हे विपश्यना सेंटर सार्वजनिक रित्या बंद असुन सध्या विपश्यना साधना शिबीर स्थगित केले आहे. जर भविष्यात येथील मेडिटेशन सेंटर ला विपश्यनेसाठी परवानगी मिळाल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा लाभ मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ड्रैगन पैलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर च्या वर्धापनदिनी अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते या भागात निसर्ग रम्य वातावरण निर्मिती व शुद्ध आँक्सिजन करिता १००० झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.


संदीप कांबळे कामठी