Published On : Thu, Sep 3rd, 2020

मोसंबी गळती व सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंताग्रस्त ना.अनील देशमुख करणार पाहणी

काटोल :- काटोल नरखेड तालुक्यातील हजारों शेतकर्यांचे नगदी पीक असलेले मोसंबी व सोयाबीन विशीष्ट रोगाच्या साथीमुळे हातातुन गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असुन या नैसर्गिक आपत्तीमध्ये शासनाकडून हेक्टरी कमीत कमी एक लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.

काटोल नरखेड तालुक्यातील अंदाजे तीस हजार हेक्टर क्षेत्रावर निंबुवर्गिय संत्रा मोसंबीच्या फळबागा असुन नेहमी या पिकांना नगदी पीक म्हणून गणल्या जाते परंतु सध्या काही विशिष्ट रोगांचे थैमान सुरू झाल्याने मोसंबी फळांची मोठ्या प्रमाणात गळती होताना दिसत आहे यावर कुठल्याही प्रकारचे औषध काम करीत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे दुसरीकडे नगदी पीक म्हणून सोयाबीन या खरीप पिकाकडे पाहण्यात येते परंतु येलो मोझॅक विषाणूंचा प्रादुर्भाव व बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाने सुद्धा दगा दिला आहे या संदर्भात पाहणी करण्यासाठी उद्यानविद्यावेत्ता, किटकशास्त्रज्ञ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अधिक्षक डॉ मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, तालुका कृषी अधिकारी कन्नाके, नरखेड तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, काटोल पंचायत समिती सदस्य निलिमा ठाकरे, नरखेड पंचायत समिती सभापती निलिमा रेवतकर, वैभव दळवी, मनोज जवंजाळ, डॉ. अनिल ठाकरे, दिनेश मानकर, कृषी सहसंचालक डॉ. प्रज्ञा गोडघाटे इ अधिकारी व पदाधिकारी यांनी काटोल नरखेड तालुक्यातील शेतजमीनींची पाहणी केली त्यावेळी मोसंबी फळे झाडावरच पिवळी पडून सडत आहे त्यामुळे जवळपास साठ ते सत्तर टक्के फळांची गळती झालेली दिसुन येत आहे व आजपर्यंत अशी गळ कधीच पाहिलेली नसुन इतिहासात प्रथमच या प्रकारची गळ पहाण्यात येत असल्याचे वयोवृद्ध शेतकऱ्यांनी सांगितले बाहेरुन चांगली फळे दिसत आहे ती जरी बाहेरून चांगली दिसत असली तरी आतुन सडलेली असल्याने ती बाजारात विकल्यानंतर एका दिवसात खराब होत असल्याने व्यापारी ती फळे परत पाठवत आहेत.


सदर बाब कृषी विद्यापीठाचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी व कृषी विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण करून हा हवेतुन पसरणारा बुरशीजन्य विषाणु असुन यावर मेटेलॅक्झील व मॅन्कोझेब किंवा फाॅसीटील ए एल या औषधींची फवारणी करावी. तसेच सोयाबीन पिकांवर येलो मोझॅक विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरीवर्ग संपूर्ण कोलमडला आहे त्यात संत्रा मोसंबी पिकांवर होणाऱ्या ब्राऊन राॅट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करुन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे

शेतकर्यांच्या नुकसानीची तिव्रता लक्षात घेता
. शनिवारी ५ सप्टेंबर रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे दोन्ही तालूक्यातील नुकसानग्रस्त फळबाग व सोयाबीन ची पाहणी करणार आहेत.