
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर सोमवारी रात्री दगडफेक झाली. तर ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजपचे नेते परिणय फुके यांनी या संपूर्ण प्रकरणात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला ‘फेक दगडफेक’ आहे. सगळं स्क्रीप्टेड झालं असं दिसत आहे. पोलिसांनी तातडीने एसआयटी नेमून याप्रकरणाची चौकशी सुरु करावी. उद्याच्या मतदानावर याचा परिणाम होणार नाही. चौकशीत सत्य बाहेर आले पाहिजे.
सलील देशमुख यांचा पराभव होत असल्याने अनिल देशमुख यांनी स्वतःवर ‘फेक दगडफेक’ केली, असा आरोप परिणय फुके यांनी केला. हे आरोप करतानाच परिणय फुके यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांच्या गाडीचा वेग कमी का होता? अनिल देशमुख यांच्यासोबत 10 वर्षांपासून सोबत असणारा बॅाडीगार्ड नेमका कालच मागच्या गाडीत का बसला होता? घटनेनंतर बॅाडीगार्ड तिथे वेळेत का पोहोचला नाही? त्यांनी आरोपींवर फायरिंग का केली नाही? गाडीवर आढळलेला 10 किलोचा दगड फेकून मारणं शक्य आहे का? 10 किलोचा दगड जवळून येऊन गाडीवर टाकलेला दिसतोय. 10 किलोचा दगड 20 फुटांवरून कसा फेकला जाऊ शकतो? दगड कारच्या काचेच्या खाली ठेवलेला दिसतोय, असे परिणय फुके यांनी म्हटले. फुके यांच्या आरोपाला देशमुख काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




