Published On : Sat, Jun 22nd, 2019

कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा सुधारित दौरा

सोमवारी (24 जून) सकाळी 5.20 वाजता नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण

अमरावती : राज्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे हे रविवारी (23 जून) जिल्हा दौ-यावर येत आहेत. यादिवशी दुपारी 12.40 वाजता वरूड तालुक्यातील मुसळखेडा येथे आत्मा गटाचा मेळावा होणार असून, कृषी मंत्री यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. याचदिवशी सायंकाळी अमरावती शहरात त्यांचे आगमन होणार असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या, तसेच भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे.

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : शनिवारी (22 जून) सायंकाळी 8.45 वाजता मुंबई येथून विमानाने नागपूरकडे प्रयाण. रा. 10.10 वाजता नागपूर येथे आगमन व त्यानंतर रवीभवन येथे राखीव.

रविवारी (23 जून) सकाळी 8.20 वाजता दिलीप वैद्य (कृष्णाई इम्प्रेस, रेशीमबाग बगिच्यासमोर, नागपूर) यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी 8.40 वाजता हेडगेवार भवन येथे कार्यकर्त्यांशी भेट, सकाळी 9.10 वाजता दीक्षाभूमी येथे भेट, सकाळी 9.20 वाजता मधुकरराव जुमळे यांच्या निवासस्थानी भेट, सकाळी 9.30 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट, सकाळी 10.40 वाजता कळमेश्वर येथे भेट, सकाळी 11 वाजता काटोल नगरपरिषद येथे भेट व कार्यकर्त्यांशी भेट, सकाळी 11.40 वा. पारडसिंगा येथे अनुसया माता मंदिर येथे दर्शन, सकाळी 12.10 वाजता वेढापूर येथे श्री हनुमान महाराज मंदिरात दर्शन, दुपारी 12.20 वाजता मुसळखेडा येथे श्री यशवंत महाराज, श्री योगिराज महाराज दर्शन, दुपारी 12.40 वा. मुसळखेडा येथे आत्मा गटाचा मेळावा, दुपारी 1.40 वाजता वरुड येथे इंदिरा चौक ते सावता चौक (श्री सावता मंदिरात दर्शन) ते आंबेडकर चौक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण), ते केदार चौक (महात्मा गांधी व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण) ते पांढुर्णा चौक ते मुलताई चौक अशा विविध स्थळांना भेटी.

दु
पारी 2. 40 वा. शेंदुरजना घाटकडे प्रयाण व तिथे शिवसेना चौक येथे कार्यकर्त्यांच्या भेटी, दुपारी 3.30 वा. शें. घाट येथून वरुडमार्गे जरूडकडे प्रयाण, दु. 3.50 वा. जरूडहून बेनोड्याकडे प्रयाण व कार्यकर्ता भेट, दु. 4.10 वाजता बेनोडा येथून हिवरखेडकडे प्रयाण व कार्यकर्ता भेट, सायं. 5 वाजता मोर्शी येथे रामजीबाबा महाराज दर्शन, गणपती मंदिर दर्शन, सायंकाळी 6 वाजता मोर्शी येथून अमरावतीकडे प्रयाण, सायं. 6.50 वाजता अमरावती येथे आगमन व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन कार्यक्रम, सायं. 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन कार्यक्रम, सायंकाळी 7.10 वा. अमरावती भाजपा कार्यालय भेट, सायंकाळी 7.20 वाजता राजापेठ येथे स्वागत कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 7.30 वाजता राजापेठ निवासस्थान येथे आगमन व राखीव, रा. 9.30 वाजता अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण व नंतर रवीभवन, नागपूर येथे मुक्काम.


सोमवारी (24 जून) सकाळी 5.20 वाजता नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.